सोलापूरच्या या 11 गावांना कर्नाटकमध्ये का जायचंय?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 11 गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव संमत केला आहे.
सीमालगतच्या गावांमध्ये महाराष्ट्र सरकारने मूलभूत सोयी-सुविधादेखील दिल्या नाहीत, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. ही परिस्थिती पाहण्यासाठी आम्ही सीमाभागातल्या आळगी गावात गेलो.
गावातून शहरात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने गरोदर महिला, रूग्ण, विद्यार्थी, शेतकरी सगळ्यांचं मोठं नुकसान होत आहे.
गावाच्या अगदी समोर असलेल्या कर्नाटकमधील गावात मात्र गावकऱ्यांना सर्व सुविधा मिळतात, असाही गावकऱ्यांचा दावा आहे.
व्हीडिओ रिपोर्ट - दिपाली जगताप
शूट - नितीन नगरकर
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



