उन्नाव बलात्कार प्रकरणेतील सर्व्हायवरने तिचा आठ वर्षांतील संघर्ष सांगताना काय म्हटलं?

उन्नाव बलात्कार प्रकरणात सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेला भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगरच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर कुलदीप सेंगर तुरुंगाबाहेर येऊ शकेल अशी भीती उन्नाव बलात्कार प्रकरणातील सर्व्हायवरने व्यक्त केली होती.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे कुलदीप सेंगर आता तुरुंगातच राहील असे दिसत आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बीबीसीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, बलात्कार पीडितेने कुलदीप सिंग सेंगरविरुद्धच्या न्यायालयाच्या निर्णयाचा तिच्यावर कसा परिणाम झाला हे सांगतांना तिच्या आठ वर्षांच्या संघर्षाची आठवण करून दिली.

सूचना - सर्व्हायवरचा आवाज तिची ओळख लपवण्यासाठी बदलण्यात आला आहे.

व्हिडिओ: प्रेरणा

शूट आणि एडिट : अंतरिक्ष जैन आणि अल्ताफ

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)