कालबेलिया कुटुंबांना घरातच मृतदेह का पुरावे लागतात?

कालबेलिया कुटुंबांना घरातच मृतदेह का पुरावे लागतात?

राजस्थानच्या सांस्कृतिक पटलावर पारंपरिक नृत्य आणि संगितासाठी ओळखल्या जाणाऱ्या कालबेलिया समाजाचं मोठं महत्त्व आहे.

नाथ-जोगी संप्रदायाचं पालन करत असल्याने या समाजात मृत्यूनंतर मृतदेहाला पुरलं जातं. कालबेलिया समाजातील बहुतांश लोक आजही भटक्यांचं आयुष्य जगत असले, तरी यापैकी अनेकजण आता स्थिरावू लागले आहेत.

मात्र आजही अनेक कुटुंबांना सन्मानजनक अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या जमिनीचा हक्क मिळालेला नाही.

पाहा हा रिपोर्ट

रिपोर्ट: आशय येडगे

शूट, एडिट: देवेश चोपडा

एक्झिक्यूटिव्ह प्रोड्यूसर: सुशीला सिंह

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)