'स्वप्नांचं शहर' मुंबई विकलांग व्यक्तींसाठी किती सोयीचं आहे?

'स्वप्नांचं शहर' मुंबई विकलांग व्यक्तींसाठी किती सोयीचं आहे?

स्वप्नांचं शहर म्हणून ओळखली जाणारी मुंबई विकलांग व्यक्तींसाठी किती सोयीची आहे? अजून तरी नाही. लोकल ट्रेन, बस, टॅक्सी, फुटपाथ आणि सार्वजनिक शौचालयं वापरायचं असेल, तर विकलांग व्यक्तीला खूप विचार करावा लागतो. दररोजचा प्रवास अनेक विकलांग मुंबईकरांसाठी अडथळ्यांची शर्यत ठरतो.

व्हीलचेअरवर असलेल्या पॅरा फेन्सिंग खेळाडू नीतू मेहता यांच्या दैनंदिन प्रवासाचा अनुभव त्रासदायक आहे. प्रवासासाठी जास्त वेळ, अनिश्चितता, मदतीवर अवलंबून राहावं लागणं आणि अपुऱ्या सुविधा यामुळे त्यांना रोजचा ताण सहन करावा लागतो.

दिव्यांग हक्क कायदा 2016 मध्ये सार्वजनिक सुविधा सुलभ असणं बंधनकारक आहे. ते करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला व्यवस्था अधिक समावेशक करावी लागणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)