You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईच्या कचऱ्याची किंमत कांजूर डम्पिंग ग्राउंड जवळच्या लोकांना कशी मोजावी लागतेय?
मुंबईतील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. दुर्गंधी, केमिकल्सचा वास, धूर आणि कचऱ्यामुळे कांजूरमार्ग, भांडुप आणि विक्रोळी परिसरातील रहिवासी श्वसनाचे आजार, मळमळ, उलट्या आणि अशा गंभीर समस्यांना सामोरे जातायत. पालिकेच्या आकडेवारीनुसार दररोज हजारो टन कचरा या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जातो, त्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावरही होतोय. मानवी वस्ती, खारफुटी आणि फ्लेमिंगो अधिवासाच्या जवळ असलेलं हे डम्पिंग ग्राउंड पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही वादग्रस्त ठरलंय. न्यायालयीन लढाई सुरू असतानाच स्थानिकांच्या आरोग्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.
रिपोर्ट- अल्पेश करकरे
शूट- शार्दुल कदम
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)