चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

फोटो स्रोत, FACEBOOK
भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. ते 59 वर्षांचे होते.
ते सलग तीनवेळा चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते.
गेली 3 वर्षे ते कर्करोगामुळे आजारी होते. अखेर आज त्यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज थांबली.
लक्ष्मण जगताप यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
ट्वीटरवर ते लिहितात, "चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. मतदारसंघाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो व जगताप कुटुंबीयांना दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो ही प्रार्थना."
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहताना ट्वीटरवर लिहिलं आहे, "माझे मित्र आणि सहकारी पिंपरीचे आ. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मनाला वेदना देणारे आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना, आप्तस्वकीयांना, मित्रपरिवाराला लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमध्ये चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी उपचारासाठी पुण्यातून मुंबईपर्यंत प्रवास केला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
राज्यसभा निवडणूक 10 जून 2022 रोजी तर विधानपरिषद निवडणूक 20 जून 2022 रोजी झाली होती. या निवडणुकीत भाजपने विजय प्राप्त केला होता. त्यावेळी मुक्ता टिळक यांच्याप्रमाणेच चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनीसुद्धा रुग्णवाहिकेतून येऊन मतदान केलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा भाजपने जिंकल्यानंतर त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी हा विजय आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केला होता. त्यावेळचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अनेकांनी त्यांच्या पक्षनिष्ठेला सलाम केला. तसंच, त्यांच्या तब्येतीबाबत काळजीही व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वीच मुक्ता टिळक यांचे निधन झाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)