‘एवढा मोठा प्रोजेक्ट झाला, तर आमची पोटची भाकरीच जाणार आहे’; पश्चिम घाटातील या प्रकल्पाला विरोध का होतोय?

व्हीडिओ कॅप्शन, ‘एवढा मोठा प्रोजेक्ट झाला तर आमची पोटची भाकरीच जाणार आहे’ पश्चिम घाटातील या प्रकल्पाला विरोध का होतोय?
‘एवढा मोठा प्रोजेक्ट झाला, तर आमची पोटची भाकरीच जाणार आहे’; पश्चिम घाटातील या प्रकल्पाला विरोध का होतोय?

कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरंट कंपनीचा जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. प्रकल्पाची पर्यावरणीय जनसुनावणी प्रदूषण मंडळ अधिकारी, तालुका व जिल्हा प्रादेशिक अधिकारी यांच्यासमोर 3 सप्टेंबरला गौरकामत गावात पार पडली.

यावेळी प्रकल्पाच्या सभोवतालचे गावकरी, पर्यावरण अभ्यासक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पर्यावरण आणि मानवी जीवनावर प्रकल्पाचा परिणाम होणार असल्याचं सांगत प्रकल्पाला विरोध होतोय तर जन सुनावणीनंतर गावांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

रिपोर्ट- अल्पेश करकरे

शूट- शार्दुल कदम

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)