‘भिंत कोसळल्यानं शाळा मंदिरात भरवण्याची वेळ’; पावसामुळं विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर किती आणि कसा परिणाम?
‘भिंत कोसळल्यानं शाळा मंदिरात भरवण्याची वेळ’; पावसामुळं विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर किती आणि कसा परिणाम?
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसोबत शाळांनाही मोठा फटका बसलाय. अनेक शाळांची छतं गळत आहेत, काही ठिकाणी स्लॅबला तडे गेलेत तर भिंती कोसळण्याची वेळ आली आहे.
लोहारा तालुक्यात एका शाळेचा छत कोसळल्याची घटना घडली. फक्त लोहारा तालुक्यातच 12 शाळांना फटका बसला असून 50 हून अधिक वर्ग वापरण्यायोग्य राहिलेल्या नाहीत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)