धाराशिव जिल्हा अतिवृष्टीनं संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केल्यानं वाद, नेमकं प्रकरण काय?
धाराशिव जिल्हा अतिवृष्टीनं संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केल्यानं वाद, नेमकं प्रकरण काय?
मागील 3 दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून परंडा, भूम, कळंबसह अनेक भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी आणि नागरिक गंभीर अडचणीत आहेत.
दुसरीकडे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा नृत्याचा व्हीडिओ समोर आला आहे. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला.
24 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर आणि सोलापूर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भूम आणि वाशी परिसराला भेट दिली. मात्र, याच दिवशी जिल्हाधिकारी पुजार यांनी तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव आणि कलाकारांसोबत नृत्य केले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






