'घरात साप निघताहेत, धान्य भिजलंय, रात्रीपासून पाणी बाहेर फेकतेय', बीडच्या आजींची व्यथा
'घरात साप निघताहेत, धान्य भिजलंय, रात्रीपासून पाणी बाहेर फेकतेय', बीडच्या आजींची व्यथा
"घरात साप निघताहेत, धान्य भिजलंय, रात्रीपासून पाणी बाहेर फेकतेय…" ही आहे बीडमधील एका आजींची व्यथा. गेल्या चार दिवसांच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे.
घरे जलमय झाली आहेत, कुटुंबं विस्कळीत झाली आहेत आणि ग्रामीण भागातले लोक अक्षरशः जगण्यासाठी संघर्ष करत आहेत.
बीडमधील या आजींच्या घरातही पूर शिरल्याने त्यांचं दैनंदिन जीवन उद्ध्वस्त झालं आहे. धान्य सडतंय, घरात साप सरपटतायत आणि पाणी बाहेर फेकून जगण्याची धडपड सुरू आहे. दरम्यान, आज पुन्हा काही भागांत पावसाने हजेरी लावल्याने या संकटात अधिक भर पडली आहे
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन





