मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाला अपघात, वाहतूक विस्कळित

विमान

फोटो स्रोत, UGC

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर एका खासगी विमानाला अपघात झाला. त्यामुळे विमानतळाचा रन वे काहीकाळ पूर्णपणे बंद पडला होता. परिणामी मुंबई विमानतळावरची वाहतूक काही काळासाठी बंद पडली होती.

काही विमानं इतरत्र वळवण्यात आली होती, पण आता धावपट्टी सुरू झालीय आणि हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येत आहे.

तातडीनं बचावकार्य हाती घेऊन रनवे क्विअर करण्यात आला आहे.

विशाखापट्टणम ते मुंबईला येणारं हे विमान होतं.

हे विमान मुंबई विमानतळावर लँड होताना धावपट्टीवर कोसळलं आणि त्यानंतर धावपट्टी सोडून बाहेर गेलं, असं डीजीसीएच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

“हा अपघात एवढा भीषण होता की विमानाचे जागीच 2 तुकडे झाले. त्यामुळे विमानचे दोन्ही पंख तुटले. त्यातून इंधनाची गळती सुरू झाली आणि परिणामी आग लागली. पण बचाव पथकानं तात्काळ तिथं धाव घेऊन आग विझवली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप वाचवलं आहे,” अशी माहिती डीजीसीएच्या सुत्रांनी बीबीसी मराठीला दिली आहे.

विमानाची तिन्ही चाकं तुटली आहेत. तसंच विमानातली वातानुकुलित यंत्रणा पूर्णपणे निकामी झाली आहे.

हा अपघात नेमका कसा झाला याची सध्या चौकशी सुरू आहे. लवकरच अपघाताचं कारण पुढे येईल असंही सांगण्यात आलं आहे.

व्हीडिओ कॅप्शन, मुंबई विमानतळावर धावपट्टीवरून विमान कोसळलं, पाहा काय घडलं...

Learjet 45 aircraft VT-DBL नावाचं ते एक प्रायव्हेट जेट होतं. विमानात सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबर होते.

मुसळधार पावसामुळे फक्त 700 मी अंतरावरच दिसत होतं. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

विमान

फोटो स्रोत, UGC

या अपघातानंतर डेहराडून ते मुंबई UK 865 हे विमान गोव्याकडे वळवण्यात आलं होतं. तसंच विस्तारा विमानतळाची दोन विमानं बंगळुरूकडे वळवण्यात आली होती.

“अतिशय मुसळधार पाऊस होता. मी माझ्या उड्डाण अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांच्याकडे पाहा. ते रनवेला समांतर धावत होते. 10 सेकंदांनंतर ATC वाले क्रॅश क्रॅश असं ओरडायला लागले,” असं तरुण शुक्ला या वैमानिकाने सांगितलं

या अपघातानंतर डेहराडून ते मुंबई UK 865 हे विमान गोव्याकडे वळवण्यात आलं होतं.

तसंच विस्ताराची दोन विमानं बंगळुरूकडे वळवण्यात आली होती.

तसंच पाच विमानं सुरतकडे वळवण्यात आली होती.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)