शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण ते प्रकाश आंबेडकर; अक्षय शिंदेच्या एनकाउन्टर कुणी काय म्हटले?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रविण सिंधू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
बदलापूरमधील चिमुकल्या शाळकरी मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची पाठराखण केली.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधकांनी या घटनेवर शंका उपस्थित केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) व भाजपाशी संबंधित संस्थाचालकांना वाचवण्यासाठी आरोपीला मारल्याचा आरोप करत विरोधकांनी या चकमकीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपाशी संबंधित संस्था चालकांना वाचवण्याचा गृहखातं प्रयत्न करत आहे का, असा प्रश्न विचारला.
ते म्हणाले, “याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे. अक्षय शिंदेने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदेने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय मिळाली?”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
“पोलीस इतके बेसावध कसे असू शकतात? बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आमची मागणी आहे, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे,” अशी मागणी वडेट्टीवारांनी केली.


“मुख्य आरोपीला संपवून आरएसएस आणि भाजपा पदाधिकारी असलेल्या संस्थेच्या लोकांना वाचवलं जात आहे की काय अशी शंका लोकांमध्ये आहे आणि आम्हालाही ही शंका येते आहे. न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. सरकारने या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं नाही, तर आम्ही न्यायालयातही जाऊ,” असा इशाराही वडेट्टीवारांनी दिला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी वरिष्ठ पातळीवरून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न विचारला. ते म्हणाले, “सत्य समोर येण्यासाठी एन्काउन्टरची न्यायालयीन चौकशी करावी. एक महिना उलटला तरीही बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही. फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काउन्टर करून प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केला जातोय का?”
'फरार आरोपींना वाचवण्यासाठी एन्काउन्टरचा डाव आहे का?'
नाना पटोले म्हणतात “बदलापूर चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला कायद्याने कठोर शिक्षा व्हायला हवी होती, याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. पण एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना पोलीस अधिकाऱ्याचीच बंदूक हिसकावून घेऊन गोळीबार करतो ही बाब अत्यंत गंभीर आहे.
"या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. एक महिना उलटला तरीही बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, त्या आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ का केली जात आहे? फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काउन्टर करून प्रकरण संपवण्याचा डाव आहे का?” असेही प्रश्न पटोलेंनी विचारले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
नाना पटोलेंनी उपस्थित केलेले प्रश्न
- बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही?
- फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काउन्टर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का?
- हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काउन्टर केले आहे का?
या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी.

फोटो स्रोत, ANI
ही घटना संशयास्पद असल्याचं नमूद करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले, “बदलापूरच्या नराधमाने जे अमानुष कृत्य केलं होतं, त्याबद्दल त्याला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीच व्हायला हवी होती. पण आज संध्याकाळी जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद आहे. या घटनेचा वापर करुन स्वतःची पाठ थोपटून घेणारे, राजकीय स्वार्थ साधू पाहणारे महाभागही आता पुढे येण्याची शक्यता आहे.”
“या प्रकरणाचा राजकीय वापर करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ करु पाहणारेही दिसू लागतील. पण या शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? आजच्या घटनेचा आणि या लपवालपवीचा काही संबंध आहे का? याची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
आदित्य ठाकरेंनी विचारलेले प्रश्न
- लैंगिक अत्याचार झाले त्या बदलापूर शाळेचे विश्वस्त कुठे आहेत? त्यांना भाजपा-मिंधे सरकारकडून वाचवण्याचा प्रयत्न का केला जातो आहे?
- महिला पत्रकार स्वतःवर बलात्कार झाल्याप्रमाणे प्रश्न का विचारत आहे, असा प्रश्न विचारणाऱ्या मिधें गटाचा स्थानिक नेता वामन म्हेत्रेबाबत काय झालं? त्याला का वाचवलं जात आहे?
- आंदोलन करणाऱ्या नागरिकांविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जाणार का? त्यांना गँगस्टरप्रमाणे वागवलं जात आहे. ते केवळ पोलिसांनी आठवडाभर गुन्हा दाखल करायला नकार दिला त्याविरोधात आंदोलन करत होते. पोलीस कुणाला वाचवत होते? शाळेचे विश्वस्त भाजपाशी संबंधित आहेत. त्यांना वाचवलं जात आहे हे खरं आहे का? हे सरकार याचं उत्तर देणार का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, “अक्षय शिंदेने पोलिसांवर हल्ला केला? त्याला पोलीस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले आणि तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडले? कुणाला वाचविण्यासाठी शिंदे फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे.”
“बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांसमोर मृत्यू, हा शाळेच्या संचालक असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याला वाचवण्याचा डाव तर नाही ना?” असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे.
'या नियमाचं पालन झालं असतं, तर एन्काउन्टर टळलं असतं'
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही या घटनेवर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, “कायदेशीर प्रक्रियेचं पालन झाल्याशिवाय न्याय अपूर्ण आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या नेतृत्वातील सरकारचं अपयश आहे.”

फोटो स्रोत, ANI
“पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीवर गोळीबार झाला. यानंतर हे एन्काउन्टर म्हणजे षडयंत्र असल्याचा जो संशय निर्माण झाला. हे संशयाचं धुकं नष्ट करण्यासाठी पोलीस जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा वैद्यकीय अहवाल लवकरच जारी करतील, अशी आहे. पोलिसांनी सायंकाळी 5 वाजल्यानंतर आरोपींना कुठेही नेऊ नये या नियमाचे पालन केले असते, तर हे एन्काउन्टर टाळता आलं असतं,” असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी नियमांवर बोट ठेवलं.

फोटो स्रोत, ANI
पृथ्वीराज चव्हाण यांनी बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एन्काउन्टर आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची महाराष्ट्रातील उपस्थिती नमूद करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “गोळीबाराची घटना एन्काउन्टर होता यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. आधी पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रयत्न असल्याची गोष्ट पसरवली. नंतर पोलिसांनी आरोपीने हल्ला केला, त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून हे एन्काउन्टर असल्याची गोष्ट सांगितली. कुणावर विश्वास ठेवायचा हे आम्हाला माहिती नाही.
"मात्र, हा महाराष्ट्र पोलिसांसाठी काळा दिवस आहे. एकेकाळी महाराष्ट्र पोलिसांची देशभरात प्रतिष्ठा होती. मात्र आज काय होतंय आपण पाहतो आहे. जेव्हा राजकीय म्होरक्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा पोलिसांची ही अवस्था होते. या घटनेने या अत्याचार प्रकरणात याशिवाय इतर उच्चपदस्थ व्यक्तीचा सहभाग असल्याच्या अफवेला बळ मिळत आहे," पृथ्वीराज चव्हाण म्हणतात.
“बदलापूर प्रकरणातील आरोपीचं एन्काउन्टर झालं त्याचवेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड महाराष्ट्रात होते. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे. या सरकारकडून न्याय होऊ शकत नाही. कोण कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे याचं सत्य महाराष्ट्राच्या जनेतला समजून घ्यायचं आहे. हे केवळ सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या समितीकडूनच होऊ शकतं,” असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.
वरिष्ठ माजी पोलीस अधिकाऱ्यांकडूनही गंभीर प्रश्न उपस्थित
राज्य गुप्तचर विभागाचे माजी अधिकारी शिरीष इनामदार यांनी बदलापूर एन्काउन्टरबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले.
ते म्हणाले, “ज्या प्रकारे पोलिसांनी प्रेस नोट काढली त्यामधून उत्तरापेक्षा प्रश्नच अधिक निर्माण होतात. अक्षय शिंदेला तळोजा तुरुंगातून नेतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्याच्या चेहऱ्याला मास्क घातलेलं असून हाताला बेड्या लावल्या आहेत. तशाच अवस्थेत त्याला गाडीत बसवलं असेल, तर मग त्यानं बेड्या लावलेल्या हातानं बंदूक कशी खेचली? मास्कमधून त्याला बंदूक अचूक कशी दिसली? त्याला बेड्या ठोकल्या होत्या तर त्याच्या हाताला दोरी बांधून ती पोलिसांनी का पकडून ठेवली नाही? बेड्या घातलेला आरोपी असा पळून जाऊ शकतो का?
"मग पोलीस इतके निष्काळजी का वागले? त्याला वाहनातून नेताना त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला पोलीस बसले होते का? ते बसले असतील, तर आरोपीचा हात पोलिसांच्या बंदुकीजवळ कसा गेला? आरोपीनं बंदुकीचं लॉक कसं उघडलं? ज्या अधिकाऱ्यांच्या गोळ्यांनी तो जखमी झाला ती गोळी किती अंतरावरून झाडली गेली? पोलिसांनी प्रेस नोटमध्ये स्वसंरक्षणार्थ शब्द वापरला आहे. एकाच गोळीत त्याचा मृत्यू झाला. ती गोळी त्याला ताब्यात घेण्यासाठी चालवली होती, की त्याला मारण्यासाठी चालवली होती?” असा प्रश्न इनामदार यांनी विचारला.
“संवेदनशील गुन्ह्यात 6 आरोपी फरार असताना हा आरोपी मरता कामा नये हा पोलिसांचा आग्रह असायला हवा होता. त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, तरी त्याला गाडीत कंट्रोल करता आलं असतं? कैद्याला ने-आण करण्याचं काम गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचं नसतं. त्यांचं काम तपास करणं असतं. मग कैद्यांना ने-आण करण्यासाठी असे अधिकारी का नेमले? हे अधिकारी नेमण्यामागचा उद्देश काय होता? एकूण 4 गोळ्या गाडीत झाडल्यात तर मग गाडीच्या आतल्या बाजूला 2 गोळ्या लागल्या असतील. त्याचे फोटो पोलिसांनी का दाखवले नाहीत?” असे अनेक प्रश्न माजी पोलीस अधिकारी इनामदार यांनी विचारले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
आरोपी अक्षयची आई अलका शिंदे म्हणाल्या, “मी अक्षयला विचारलं की, जेवण मिळतं का? त्यावर त्याने जेवण मिळतं असं सांगितलं. तसेच जेवण करण्यासाठी मला पैसे पाठव असं म्हटला. त्यावर मी पोलीस पैसे घेत नाहीत, मी पैसे कसे पाठवू म्हटलं. त्याने मला त्याच्यासोबत असणाऱ्या एका वृद्ध कैद्याचा मोबाईल नंबर दिला. यानंतर एका तासात माझ्या मुलाला मारून टाकण्यात आलं.”
“पोलिसांनी थेट गोळी झाडून अक्षयला मारून टाकलं आणि सांगतात की, त्यानेच गोळी झाडली. त्या मुलाला फटाकडे वाजवता येत नाहीत, गाडी चालवता येत नाही आणि तो बंदूक चालवेल का? त्यांची नावं मोठी करण्यासाठी अक्षयवर काहीही आरोप केले जात आहेत. आता आम्हाला जगायचं नाही, तर मरायचं आहे,” अशी भावना अलका शिंदे यांनी व्यक्त केली.

इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “बदलापूर प्रकरणातील आरोपीवर त्याच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला होता. त्यामुळे पोलीस त्याला तपासासाठी घेऊन जात होते. यावेळी आरोपीने सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांच्यावर गोळीबार केला. यात ते जखमी झाले. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी ही कारवाई केली.”
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना उत्तर
अक्षय शिंदेच्या एन्काउन्टरनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अक्षय शिंदेच्या पूर्वपत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. त्यासंदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन, पोलीस त्याला नेत होते. त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांवर आणि हवेत गोळीबार केला. पोलिसांनी संरक्षणार्थ गोळी चालवलेली आहे. त्यानंतर अक्षय शिंदेला दवाखान्यात नेण्यात आलं. यामध्ये या आरोपीचा मृत्यू झाला आहे."
“विरोधक प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उपस्थित करतात. हेच विरोधक आरोपीला फाशी देण्याची मागणी करत होते. पोलिसांवर गोळीबार झाल्यावर ते त्यांचं स्वरक्षण करणार की नाही? मला वाटतं यावर वाद निर्माण करणं चुकीचं आहे,” असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी कुणाकुणावर आरोप?
बदलापूरमधील चिमुकल्या शाळकरी मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात सुरुवातीला पालकांनी तक्रार करूनही संस्थाचालकांनी व शाळा प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली नाही.
त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यापासूनच हलगर्जीपणा समोर आला होता. इतकंच नाही, तर शाळेतील सीसीटीव्हीचं 15 दिवसांचं फुटेज गायब असल्याची बाब सरकारच्या द्विसदस्यीय अहवालातून समोर आली.
त्यामुळे या प्रकरणात अक्षय शिंदेशिवाय इतरही आरोपी आहेत. बदलापूर येथील संबंधित शाळेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यावर पॉक्सो अंतर्गत सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











