इर्शाळवाडीची दरड कोसळण्याची घटना समजून घ्या 7 फोटोंमधून

इर्शाळवाडीची दरड कोसळण्याची घटना समजून घ्या फोटोंमधून

फोटो स्रोत, UGC

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. रायगडमधील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून सुमारे 98 जणांना शोधण्यात यश आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

इर्शाळवाडीची दरड कोसळण्याची घटना समजून घ्या फोटोंमधून

फोटो स्रोत, UGC

यंत्रणा दाखल होऊनसुद्धा येथील पाऊस आणि बिकट परिस्थितीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अद्याप बचावकार्य सुरू होण्यास उशीर लागला.

इर्शाळवाडीची दरड कोसळण्याची घटना समजून घ्या फोटोंमधून

फोटो स्रोत, UGC

प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल.

आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

इर्शाळवाडीची दरड कोसळण्याची घटना समजून घ्या फोटोंमधून

फोटो स्रोत, UGC

उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले असून तिथून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शाळगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण करीत आहेत.

इर्शाळवाडीची दरड कोसळण्याची घटना समजून घ्या फोटोंमधून

फोटो स्रोत, UGC

इर्शाळवाडीकडे जाणारा रस्ता पावसामुळे अत्यंत निसरडा झाल्याने बचाव पथकाला तिथे पोहोचण्यात प्रचंड अडथळे येत आहेत.

इर्शाळवाडीची दरड कोसळण्याची घटना समजून घ्या फोटोंमधून

फोटो स्रोत, UGC

आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी व मदतकार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने पोहोचले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेतला आहे.

प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

https://twitter.com/ANI/status/1681871240708116480

फोटो स्रोत, ANI

रात्री मंत्री गिरीश महाजन , मंत्री उदय सामंत, मंत्री दादाजी भुसे यांनी भेट देऊन आढावा घेतला.

या अनुषंगाने मदत कार्याची घेतली माहिती घेऊन प्रशासन व पोलीस मदत कार्यात गुंतलेल्या यंत्रणा, स्वयंसेवी संस्था यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने सूचना दिल्या आहेत.

हे ही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)