गेल्यावर्षी भारतात प्रवेश करू दिला नव्हता, आता मोदी सरकारने पुरस्कार जाहीर केला

दर्शन सिंह धालीवाल

फोटो स्रोत, SURJIT SINGH RAKHRA

फोटो कॅप्शन, दर्शन सिंह धालीवाल
    • Author, सुनील कटारिया
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मध्यप्रपदेशातील इंदूर शहरात आजपासून 10 जानेवारीपर्यंत केंद्र सरकारतर्फे प्रवासी भारतीय दिवस साजरा होत आहे.

हा 17वा प्रवासी भारतीय दिवस असून तीन दिवसाच्या या कार्यक्रमादरम्यान निवडक प्रवासी भारतीयांना भारत आणि परदेशात विविध क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारकडून सन्मानित केलं जाईल.

10 जानेवाराली 27 मान्यवरांना प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. यापैकी एक नाव पटियालाच्या डॉ. दर्शन सिंह धालीवाल यांचं आहे.

धालीवाल अमेरिकेत काम करतात. तसंच आपल्या समुदायातील लोकांसाठीही ते योगदान देतात. महत्त्वाचं म्हणजे हे तेच दर्शन सिंह धालीवाल आहेत ज्यांना ऑक्टोबर 2021 मध्ये दिल्ली विमानतळावरून परत अमेरिकेत पाठवण्यात आलं होतं.

कोण आहेत दर्शन सिंह धालीवाल ?

दिल्ली येथे शेतकरी आंदोलन सुरू होतं त्यावेळी दर्शन सिंह धालीवाल चर्चेत आले होते.

आंदोलनादरम्यान त्यांना दिल्ली विमानतळावरच रोखण्यात आलं होतं आणि भारतात प्रवेश करू न देता त्यांना अमेरिकेत परत पाठवण्यात आलं.

डॉ. दर्शन सिंह धालीवाल यांचे छोटे बंधू आणि वरिष्ठ अकाली नेते सुरजीत सिंह राखडा यांनी बीबीसीशी बोलताना याबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, “माझे भाऊ 1972 मध्ये अमेरिकेत गेले हाेते आणि तीन वर्षं तिथे मेकॅनीकल इंजिनीअरिंगचा अभ्यास केला. ते सुरुवातीपासून मेहनती होते. अमेरिकेतील शिकागो येथे त्यांचं गॅस स्टेशन (पेट्रोल पंप) आहे. तसंच त्यांचा प्रॉपर्टीचा व्यवसाय आहे.”

'लंगर बंद करा नाहीतर परत जा'

ऑक्टोबर 2021 मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान दर्शन सिंह धालीवाल यांना परत अमेरिकेत पाठवण्याबाबत सुरजीत सांगतात,

“दर्शन सिंह यांना दिल्ली विमानतळावरून अमेरिकेत परत जाण्यास सांगितलं होतं. तेव्हा अधिकारी म्हणाले की, ‘लंगर बंद करा, शेतकऱ्यांशी करार करा नाहीतर अमेरिकेत परत जा."

तीन कृषी कायद्यांना मागे घेण्यासाठी पंजाब, हरियाणा आणि इतर अनेक राज्यातील शेतकऱ्यांना बेमुदत आंदोलन पुकारलं होतं. एक वर्षाहून अधिक काळ हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर धरणं देत होते.

दर्शन सिंह धालीवाल

फोटो स्रोत, FB/SURJIT SINGH RAKHRA

फोटो कॅप्शन, दर्शन सिंह धालीवाल

सुरजीत सिंह राखडा यांच्यानुसार 1997 मध्ये विश्व पंजाबी सम्मेलनाची सुरुवात त्यांचे बंधू दर्शन सिंह धालीवाल यांनी केली होती. या सम्मेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भाग घेतला होता.

आता दर्शन सिंह धालीवाल यांना भारत सरकारने प्रवासी भारतीय पुरस्कार जाहीर केल्याने आपण आश्चर्यचकीत झालो असं सुरजीत सिंह राखडा सांगतात.

“या पुरस्कारासाठी लोक अर्ज करतात पण आम्ही यासाठी अर्ज केलेला नाही. सरकारने जेव्हा आम्हाला कळवलं तेव्हा आम्हाला धक्का बसला,” असं ते म्हणाले.

सामाजिक कार्यात सक्रिय

डॉ. दर्शन सिंह धालीवाल यांचं कुटुंब अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहे.

सुरजीत सिंह राखडा सांगतात, त्यांचे वडील सुबेदार करतार सिंह धालीवाल लष्करात होते.

“बापूजी गरजूंना मदत करण्याची एकही संधी सोडत नव्हते. कपडे वाटण्यापासून ते लंगर लावण्यापर्यंतची प्रत्येक सेवा ते करायचे. अमेरिकेतील विस्कॉन्सिन महाविद्यालयात बापूजींच्या नावाची एक चेयर स्थापन करण्यात आली आहे. याअंतर्गत दरवर्षी तिथे शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चार हजार डॉलर स्टायपेंड दिली जाते,” असं सुरजीत म्हणाले.

दिल्ली येथील शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिल्ली येथील शेतकरी आंदोलन

आनंदपूर साहिबस्थित दशमेश अकादमी जेव्हा बंद होऊ लागली तेव्हा या कुटुंबाने एक कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. तसंच तामिळनाडूमध्ये आलेल्या त्सुनामी दरम्यानही त्यांच्या कुटुंबाने लंगरची व्यवस्था केली होती.

त्यानंतर सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू असतानाही दिल्लीच्या सीमेवर त्यांच्यावतीने लंगरची सोय करण्यात आली होती.

'आम्ही बापूला घाबरत होतो'

संयुक्त कुटुंबात राहणारे सुरजीत सिंह राखडा सांगतात की, आपले वडील अत्यंत कडक शिस्तीचे होते.

ते म्हणाले, “बापूजी लष्करात होते. त्यामुळे त्यांचा स्वभाव कठोर होता. आम्ही त्यांना घाबरत होतो. आम्ही त्यांना कधीच कोणता प्रश्न केला नाही. ते म्हणतील तोच आमच्यासाठी कायदा.”

1985 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांनी बापूजींच्या नावे पंजाबी साहिब अकादमी पुरस्कार सुरू केला.

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

मध्यप्रदेशच्या इंदूर येथे 17 वा प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहे. त्यांच्या हस्ते पुरस्कार्थींचा सन्मान केला जाणार आहे.

 सुरजीत सिंह राखडा पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजपच्या सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुरजीत सिंह राखडा पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजपच्या सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत.

कोणत्या देशातील भारतीयांना पुरस्कार मिळणार

विविध क्षेत्रात काम आणि योगदान दिलेल्या मान्यवरांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

विविध देशांमध्ये राहणाऱ्या 27 प्रवासी भारतीयांना जणांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल.

कला, विज्ञान, औद्योगिक, शिक्षण, संस्कृती, व्यवसाय, सामाजिक कार्य, मीडिया आणि इतर क्षेत्रातील प्रवासी भारतीयांचा यात समावेश आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)