लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

निवडणूक

फोटो स्रोत, Getty Images

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं ज्या उत्सुकतेनं लक्ष लागलं होतं, त्या उत्सुकतेला महाराष्ट्रानं निराश केलं नाही. कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक लढती अगदी चुरशीच्या ठरल्या.

मात्र, अखेरीस महाराष्ट्रातल्या 48 पैकी जास्तीत जास्त जागांवर महाविकास आघाडीनेच बाजी मारली. बीडमधील निकाल जाहीर होण्यासाठी रात्री उशीर झाला. पण त्यानंतर महाराष्ट्रातील 48 जागांचं जय-पराजयाचं चित्रही स्पष्ट झालं.

महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच प्रामुख्यानं लढत झालेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 जागा, तर महायुतीला 17 जागा मिळाल्या. सांगलीतील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयानं अपक्ष उमेदवाराला एक जागा मिळाली.

लोकसभा निवडणुकीचे कल हाती येत असताना देशात NDAला 292 तर INDIA आघाडीला 234 जागांवर आघाडी आहे.

महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी खालील प्रमाणे :

निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी विजयी उमेदवारांची घोषणा केली आहे, त्यांचीच नावे या यादीत दिली आहेत. आयोगाने जाहीर केल्यानंतर ही यादी अद्ययावत केली जाईल.