'बोट उलटून 500 लोक बुडाले, मदतीला कुणीच आलं नाही'
'बोट उलटून 500 लोक बुडाले, मदतीला कुणीच आलं नाही'
दोन आठवड्यांपूर्वी ग्रीसजवळ समुद्रात एक बोट उलटली ज्यात स्थलांतर करणारे लोक होते. यातले निम्मे तरी पाकिस्तानी होते.
ग्रीसने चालवलेली शोध आणि मदत मोहीम आता संपुष्टात आली आहे. लिबियातून निघालेल्या या मच्छिमारांच्या बोटीत किमान 700 लोक होते, ज्यातले 500 लोक तरी मरण पावले असतील अशी भीती आहे.
या अपघातातून वाचलेले बहुतांश लोक सांगतात की ग्रीक यंत्रणांनी त्यांना मदत केली नाही. ग्रीसचं म्हणणं आहे की या लोकांनी मदत नाकारली होती. नेमकं काय खरं? बीबीसीचे खालिद करामत यांचा हा रिपोर्ट.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



