या मुलीला मिळाली चक्क साडे दहा कोटींची शिष्यवृत्ती

फोटो स्रोत, Daya Brown
जॉर्जियातल्या अटलांटा मधल्या वेस्टलेक हायस्कूलची विद्यार्थिनी डेया ब्राऊन हिने बाकी विद्यार्थ्यांप्रमाणे कोव्हिड काळात ऑनलाईन शिक्षण घेतलं होतं.
कोरोनाचा ज्वर ओसरल्यानंतर कुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा हे मनात ठरवून तिने यादी तयार केली.
ब्राऊनने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "माझ्यासाठी हा लक्ष वळवण्याचा मुद्दा होता. मी स्वत:ला सांगितलं की नेटफ्लिक्स बंद करूया आणि पुढे काय करायचं याचा विचार करुया".
ब्राऊनला पत्रकारिता, कविता आणि वादविवाद हे आवडायचं. अभ्यासाव्यतिरिक्त या गोष्टी डेया सहभागी होत असे. या सगळ्याची तिला नियोजन करताना मदत होऊ लागली होती.
यामुळे वास्तवात काय घडतंय त्याची जाणीव मला होती. मी स्वत:ला सांगितलं- जग थांबलंय, पण या काळात भवितव्यासंदर्भात काहीतरी करता येत होतं.
डेया यांनी नुसती कॉलेजच्या नावांची यादी तयार केली नाही तर स्कॉलरशिपसाठी अर्ज कुठे करता येईल याचाही विचार करू लागली. डेया म्हणाली, कॉलेजची फी भरण्यासाठी माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता.
आपल्या पुढच्या शिक्षणाचा खर्च पालकांवर पडू नये असं डेया यांना वाटत होतं. चार महिन्यांनंतर त्यांना अर्जाला मंजुरी मिळाल्याचं पत्र मिळालं.
कुठून कुठून आले प्रस्ताव?
डेयाने सांगितलं की, "माझ्याकडे 50 कॉलेजांचं अर्जाला मंजुरी मिळाल्याचं पत्र आलं. विभिन्न स्कॉलरशिपच्या माध्यमातून 13 लाख डॉलर (साधारणत: 10.5 कोटी रुपये) प्रस्ताव मिळाले".
जेव्हा तिला सर्वोत्तम पर्याय मिळाला तेव्हा तिने बाकी कॉलेजांना नकार कळवला.
मी 70 कॉलेजात अर्ज भरला होता. ड्यूक युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतल्यानंतर मी बाकी कॉलेजना नकार दिला.
18वर्षीय डेयाने ड्यूक युनिव्हर्सिटीची एक वर्षाची स्कॉलरशिप स्वीकारली आहे. व्हिज्युअल अँड मीडिया स्टडी अभ्यासक्रम शिकत आहे.
द गेट्स स्कॉलरशिपसाठी शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तिचं नाव होतं. अमेरिकेतल्या हायस्कूलमधल्या 300 प्रतिभावान अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्यात येईल.
माझ्यासाठी ही अतिशय मोठी गोष्ट आहे. देशातल्या अग्रगण्य स्कॉलरशिपपैकी ही एक आहे. स्कॉलरशिपमध्ये शिक्षणाचा सगळा खर्च ते उचलतात.
इतक्या साऱ्या स्कॉलरशिपसाठी अर्ज भरल्यानंतर कोणत्यासाठी अर्ज करणं कठीण असल्याचं विचारल्यावर डेया सांगते, कुठलीच नाही. आश्चर्यकारकरीत्या कुठलाही अर्ज करणं तिला फारसं कठीण गेलं नाही.
तिला वाटतं, हा एक वेटिंग गेम आहे. अर्ज करण्यात हाच मुद्दा महत्त्वाचा ठरतो. मला नंतर हळूहळू कळलं की हे संयमाचं काम आहे.
डेयाने आता बाकीच्या विद्यार्थ्यांना यासंदर्भात मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
बाकी मुली तसंच अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरू शकते. मी हे करू शकते तर ते नक्कीच करु शकतात.
स्कॉलरशिपसाठी यशस्वी अर्जाचे टिप्स

फोटो स्रोत, Daya Brown
डेयाने तीन उपाय सांगितले आहेत. अर्ज भरताना या मुद्यांची मदत झाल्याचं तिने सांगितलं.
मदत घेण्यात संकोच बाळगू नका
करिअर कोच आणि काऊंसेलरशी चर्चा करा. खूप वेळा मुलंमुली उपलब्ध संसाधनांबद्दल, संधीबद्दल विचारायला घाबरतात. शाळेतही अनेकजणांची नियुक्ती मदत करण्यासाठीच केलेली असते. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही.
सूसूत्र राहा
अर्ज करणं ही प्रक्रिया अस्ताव्यस्त आणि आव्हानात्मक ठरू शकते. सगळ्या अर्जांची शिस्तबद्ध सूची करुन ठेऊ शकतो. अर्जांचा पुन्हा वापर करता येऊ शकतो. कॉलेज म्हणजे संस्थानुरुप तुम्हाला बदल करावा लागतो इतकंच.
स्वत:ला प्रमोट करण्यासाठी पाठ्यक्रमांशिवाय इतर गोष्टींचा विचार करा.
अभ्यासक्रमातील इतर गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. यावरून एक लक्षात येतं की कॉलेज झाल्यावर ते काय करणार. ते तुम्हाला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहू इच्छितात. आपण काय आहोत आणि तुम्ही काय करू इच्छिता, हे सगळं माहिती करून घेण्यासाठी अभ्यासक्रमाच्या बाहेर असलेल्या गोष्टींमध्ये मन गुंतवा.
स्वत:ची प्रॉडक्शन कंपनी तयार केली
डेया ब्राऊन अभ्यासासाठी तयार आहे. मात्र ती नुसती बसून नाही.
ती तिच्या प्रॉडक्शन कंपनीवर काम करत आहे. हायस्कुलमध्ये असताना तिने ती नावारुपाला आणले होते.
तिच्या मते तिच्या कंपनीचं लक्ष्य युवकांमध्ये कविता, संगीत, कला आणि चित्रपटाचा प्रसार करणं हा आहे.
ती म्हणते, “एकदा तुम्ही विचारता की मी असं का करते आहे? मात्र उत्तर लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही लोकांचं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करत आहात आणि ते ठीक आहे आणि तुम्ही सतत तुमच्या उद्दिष्टाच्या जवळ जात असता."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








