'सखाराम बाइंडर' पहिल्यांदा रंगभूमीवर आलं होतं, तेव्हा वादग्रस्त का ठरलं होतं?
'सखाराम बाइंडर' पहिल्यांदा रंगभूमीवर आलं होतं, तेव्हा वादग्रस्त का ठरलं होतं?
मार्च 1972 साली पहिल्यांदा रंगभूमीवर आलेलं सखाराम बाइंडर हे नाटक प्रचंड वादळी ठरलं होतं. विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं हे नाटक. पहिल्या तेरा प्रयोगांनंतरच त्याच्यावर अश्लील असल्याची टीका होऊ लागली. सेन्सॉरने या नाटकावर बंदी घातली.
आता हेच नाटक पुन्हा आलं आहे. अभिनेते सयाजी शिंदे यात सखाराम बाइंडरची भूमिका करत आहेत. नेहा जोशी या लक्ष्मीच्या तर अनुष्का विश्वास या चंपाच्या भूमिकेत आहेत. अभिजीत झुंझारराव यांनी नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे.
इतक्या वर्षानंतरही हे नाटक का महत्त्वाचं आहे?
निर्मिती- अमृता कदम
एडिटिंग- नीलेश भोसले
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन. )






