सांगलीत तब्बल 1 कोटी 11 लाखांच्या बनावट नोटा जप्त, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

व्हीडिओ कॅप्शन, सांगलीत तब्बल 1 कोटी 11 लाखांच्या बनावट नोटा जप्त
सांगलीत तब्बल 1 कोटी 11 लाखांच्या बनावट नोटा जप्त, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

सांगली पोलिसांनी 1 कोटी 11 लाख 600 रुपयांच्या बनावट नोटांचा मोठा साठा जप्त केला आहे. अंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून, त्यामध्ये कोल्हापूरमधील एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

पोलिसांनी एकूण 99 लाख 23 हजार 300 रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. पुणे–बंगळूर महामार्गावरील कासेगाव येथे तस्करीदरम्यान 98 लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. या नोटा मुंबईकडे तस्करीसाठी नेल्या जात होत्या.

चौकशीत उघड झालं की कोल्हापूरमधील एका चहाच्या कंपनीत बनावट नोटांची छपाई सुरू होती. तिथून महाराष्ट्रातील विविध भागात या नोटांचं वितरण केलं जात होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)