अदानी समूहाच्या सिमेंट प्रकल्पाला कल्याणच्या गावकऱ्यांनी विरोध का केला आहे?
अदानी समूहाच्या सिमेंट प्रकल्पाला कल्याणच्या गावकऱ्यांनी विरोध का केला आहे?
मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील आंबिवली या ठिकाणी एक सिमेंट ग्राईंडिंग युनिट प्रकल्प प्रस्तावित आहे. अदानी समुहाच्या अंबुजा सिमेंटचा हा प्रस्तावित प्रकल्प असून याला मोहोने गावासह आसपासच्या जवळपास 10 गावातल्या ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे.
या प्रकल्पासाठी प्रदूषणाबाबतच्या नियमाचे सर्व काटेकोर पालन होईल असे अदानी समूहाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर अद्याप या प्रकल्पासाठी परवानगी दिलेली नाही तर ही प्रक्रिया सुरू आहे असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
रिपोर्टर- दीपाली जगताप
शूट- शाहीद शेख
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






