36 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होणाऱ्या आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक
36 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होणाऱ्या आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक
1988 मध्ये, सुरेखा यादव भारतीय रेल्वेमध्ये रुजू झाल्या. त्यानंतर 1989 मध्ये त्या सहाय्यक चालक बनल्या आणि हळूहळू प्रमोशन झालं. 1996 पर्यंत त्यांनी मालगाडी चालवली.
मग 2000 मध्ये त्या मोटरवुमन बनल्या आणि साधारण एका दशकानंतर त्यांच्याकडे घाट ड्रायव्हरचं काम सोपवण्यात आलं, त्या पश्चिम घाटाच्या आव्हानात्मक रुळांवर डेक्कन क्वीन चालवू लागल्या.
14 मार्च 2023 मध्ये त्यांनी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. सोलापूरपासून ते मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रतिष्ठित वंदे भारत एक्सप्रेस त्यांनी चालवत आणली.
या हाय-स्पीड ट्रेनच्या पायलट बनलेल्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. इथून पुढे त्या नियमितपणे वंदे भारत ट्रेन चालवत आल्या.






