परिवहन मंत्र्यांनी नातवाला शाळेत जायला घेतली टेस्ला; गावाखेड्यांमध्ये एसटीने शाळा गाठणारे विद्यार्थी काय म्हणाले?
परिवहन मंत्र्यांनी नातवाला शाळेत जायला घेतली टेस्ला; गावाखेड्यांमध्ये एसटीने शाळा गाठणारे विद्यार्थी काय म्हणाले?
मी माझ्या नातवाला टेस्ला कार देत आहे, कारण तो शाळेत ही कार घेऊन जाईल आणि सर्वांना पर्यावरण पूरक कारचा संदेश देईल, असं विधान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर छात्र भारतीने एक पत्र लिहित गाव-खेड्यातील विद्यार्थ्यांना किमान सन्मानाने प्रवास करता यावा यासाठी मोफत एसटी पास द्यावा असं पत्र लिहिलं आहे.
मंत्र्यांच्या या खरेदीविषयी आणि छात्र भारतीच्या या मागणीच्या अनुषंगाने बीबीसीने गावांखेड्यांमध्ये बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पाहा त्यांची या सगळ्यावर काय प्रतिक्रिया होती
रिपोर्टिंग - श्रीकांत बंगाळे आणि मुस्तान मिर्झा
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर



