अमेरिकेतील 'या' राज्यातले लोक परदेशातल्या लोकांना कमाई करण्यासाठी का बोलावत आहेत?

अमेरिकेतील 'या' राज्यातील नागरिक परदेशातील लोकांना कमाई करण्यासाठी का बोलावत आहेत?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छाय़ाचित्र
    • Author, गिलेर्मो मोरेनो
    • Role, बीबीसी मुंडो

जगभरात अनेक ठिकाणी स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. आपल्या मूळगावी किंवा परिसरात रोजगार नसल्यानं किंवा कमाईची चांगली संधी नसल्यानं लोक इतरत्र स्थलांतरित होतात. मात्र स्थलांतरितांमुळे स्थानिकांचा रोजगार जात असल्याची चर्चा होत असते.

तशी ती अमेरिकेतदेखील होते आहे. मात्र अमेरिकेतील दुरवरच्या अलास्कामधील परिस्थिती नेमकी उलटी आहे. तिथे स्थलांतरितांचं स्वागतच केलं जातं. असं का आहे हे जाणून घेऊया.

अमेरिकेत होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्थलांतरित (इमिग्रेशन) कर्मचारी हा एक मोठा मुद्दा आहे.

एडगर वेगा गार्सिया (डावीकडे) यांचं म्हणणं आहे की ते काही महिन्यांमध्ये इतकी कमाई करतात की मेक्सिकोत एक वर्ष आरामात राहू शकतात.

फोटो स्रोत, Jorge Luis Pérez Valery

फोटो कॅप्शन, एडगर वेगा गार्सिया (डावीकडे) यांचं म्हणणं आहे की ते काही महिन्यांमध्ये इतकी कमाई करतात की मेक्सिकोत एक वर्ष आरामात राहू शकतात.

कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार मेक्सिकोची सीमा ओलांडून अमेरिकेत येणाऱ्या लोकांच्या संख्येला आळा घालण्याचा मुद्दा मांडत आहेत.

मात्र याच अमेरिकेतील एक राज्य असं आहे जे अधिकाधिक लोकांनी तिथे स्थलांतर करावं यासाठी प्रयत्नशील आहे.

हे राज्य म्हणजे अलास्का. अलास्का तिथल्या थंडीसाठी, हिमनद्या आणि बर्फाच्छादित प्रदेशासाठी प्रसिद्ध आहे.

अलास्काच्या आखातात कॉपर नदीच्या त्रिभुज प्रदेशात एक मासेमारी करणारं छोटसं शहर वसलेलं आहे. इथे काम करणाऱ्या लोकांच्या जेवणात टाकोस आणि टॉर्टिल सारखे मेक्सिकन पदार्थ असतात.

अलास्कामध्ये माशांवर प्रक्रिया करणाऱ्या फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी दुरून लोक येतात. कारण इथे त्यांना त्यांच्या परिसरात मिळतात त्यापेक्षा अधिक पैसे कमावण्याची संधी मिळते. अलास्कातील कॉर्डोवा या शहरात चालणारा मत्स उद्योग ही संधी उपलब्ध करून देतो.

मेक्सिकोचे एजगर वेगा गार्सिया सांगतात की इथे 4 महिने काम करून त्यांनी 27 हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच 22 लाख रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

ओईसीडी (Organisation for Economic Co-operation and Development)नुसार मेक्सिकोचं सरासरी वार्षिक दरडोई उत्पन्न 16,269 अमेरिकन डॉलर म्हणजे 13 लाख रुपये आहे. ही कमाई त्याहुन अधिक आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

कॉर्डोवामध्ये वर्षातील बहुतांश दिवस पारा शून्याच्या खालीच असतो. तिथे मुसळधार पाऊस किंवा हिमवर्षाव होत असतो. दोन महिन्यांचा कालावधी तर असा असतो की जेव्हा सूर्याचं दर्शन देखील होत नाही. याला पोलर नाईट असं म्हणतात.

इथे उन्हाळा सुरू होताच लोकांची थंडीपासून सुटका झाल्याबरोबर स्थानिक लोक कॉपर नदी आणि तिच्या मुखावर मासेमारी करतात. तिथे ते प्रसिद्ध साल्मन मासे आणि इतर मासे पकडतात.

तेव्हा प्रचंड स्पर्धा असते. सर्वानांच निश्चित कालावधीत जास्तीत जास्त मासे पकडायचे असतात. इथल्या अर्ध्याहून अधिक नोकऱ्या मत्स उद्योगाशी निगडीत आहेत.

माशांवर प्रक्रिया करणं, पॅकिंग करणं आणि त्यांना विकण्यासाठी कंपन्यांना जास्तीत जास्त कामगारांची आवश्यकता असते. त्यामुळे कंपन्या बाहेरून कामगार आणतात.

चांगल्या पगाराच्या आकर्षणानं येतात लोक

राज्याच्या कामगार विभागानुसार अलास्काच्या सी फूड उद्योगात काम करणाऱ्यांपैकी 80 टक्के कामगार बाहेरून आलेले आहेत.

इथे अमेरिकेच्या इतर राज्यांमधून तर कामगार येतातच, मात्र बहुतांश कामगार किंवा कर्मचारी युक्रेन, पेरू, तुर्की, फिलिपाईन्स आणि मेक्सिकोमधील असतात.

इथे मिळणारा चांगला पगार आणि इथली कार्यपद्धती याकडे आकर्षित होऊन हे कामगार या भागात येतात. कारण इथे मिळणारा पगार त्यांच्या भागात किंवा शहरात मिळणाऱ्या पगारापेक्षा कितीतरी अधिक असतो.

इथे मासे पकडणारा माणूस ताशी 18.06 अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 1,500 रुपये कमावतो. जर त्यानं ओव्हरटाईम केला तर ही रक्कम जवळपास 27 डॉलर पर्यंत जाते. (अलास्कामध्ये ओव्हरटाईमसाठी पगारात 50 टक्के वाढ करणं कायद्यानं बंधनकारक आहे)

कॉर्डोवामध्ये थंडी कमी होऊ लागताच मासेमारीचं काम सुरू होतं

फोटो स्रोत, Jorge Luis Pérez Valery

फोटो कॅप्शन, कॉर्डोवामध्ये थंडी कमी होऊ लागताच मासेमारीचं काम सुरू होतं

त्याचबरोबर बहुतांश कंपन्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घर देतात आणि दिवसभरात तीन वेळा जेवण देखील देतात. यामुळे कॉर्डोवामध्ये काम करणाऱ्यांना पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही.

कंपनी राहण्या-खाण्याची व्यवस्था करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या सर्व पगाराची बचत करता येते.

गंमतीची गोष्ट म्हणजे कॉर्डोवामध्ये एकही चित्रपटगृह किंवा शॉपिंग मॉल नाही. या शहरात फक्त एकच बार आहे.

इथे जेव्हा मासेमारी करण्यासाठी अनुकूल हवामान नसतं तेव्हा मासेमार शहरातील या एकमेव बारमध्ये मद्यपान करतात आणि पूल (एकप्रकारचा खेळ) खेळतात. हे असं ठिकाण आहे जिथे लंडनमधील पब सारखं वातावरण असतं.

कंपनी कर्मचाऱ्यांना येण्या जाण्याचं भाडं देखील देते. ते महत्त्वाचं आहे. कारण कॉर्डोवा शहर दुर्गम भागात. तिथे फक्त विमान किंवा बोटीनंच पोहोचता येतं.

कॉर्डोवामधील फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं राहणीमान महागडं नसतं.

माशांवर प्रक्रिया करणाऱ्या फॅक्टरीमधील शिफ्ट नेहमी सकाळी सुरू होते आणि ती 18 तासांहून अधिक वेळ चालते

फोटो स्रोत, Jorge Luis Pérez Valery

फोटो कॅप्शन, माशांवर प्रक्रिया करणाऱ्या फॅक्टरीमधील शिफ्ट नेहमी सकाळी सुरू होते आणि ती 18 तासांहून अधिक वेळ चालते

जहाजात माल वाहतुकीसाठी वापरतात तशा कंटेनरपासून बनलेल्या एका खोलीत चार जण राहतात. तिथे त्यांना उन्हाळ्यात वापरायचं सर्व सामान एका छोट्याशा लॉकर मध्ये ठेवावं लागतं.

तिथे काम करणं सोपं नाही. कामाची शिफ्ट सहसा सकाळी सुरू होते आणि 18 तास किंवा त्याहून अधिक वेळ चालते. कारण कामगारांना एक दिवसात हजारो किलो मासे पकडायचे असतात.

अलास्कामध्ये केलेल्या चांगल्या कमाईमुळे एजगर वर्षातील बाकीचे महिने निवांतपणे घालवतात.

या काळात ते मेक्सिकोतील बाजा कॅलिफोर्निया या राज्यातील मेक्सिकाली शहरात राहतात. हे राज्य अमेरिकेच्या सीमेला लागून आहे. तिथे त्यांची 4 मुलं त्यांची वाट पाहत असतात.

मासेमारीचा मोठा उद्योग

अलास्कामध्ये मासेमारी हा एक मोठा व्यवसाय आहे. अलास्कातील मासेमारी करणाऱ्या कंपन्या आणि सागरी अन्न उद्योग वर्षाकाठी 2 हजार टनाहून अधिक मासे पकडतात.

अलास्का फेयरबॅंक्स विद्यापीठानुसार माशांची ही संख्या अमेरिकेत पकडल्या जाणाऱ्या माशांच्या निम्म्याहून अधिक आहे.

अलास्कातील मत्स उद्योगात परदेशी कामगारांची इतकी आवश्यकता भासते की 2023 मध्ये अमेरिकन सरकारनं स्थलांतरीत कामगारांना दिल्या जाणाऱ्या तात्पुरत्या व्हिसामध्ये मोठी वाढ करण्यास परवानगी देण्यास सुरूवात केली.

2022 मध्ये व्हिसाची संख्या 66 हजार होती. मात्र 2023-2024 मध्ये यात वाढ होऊन ती जवळपास 1 लाख 30 हजार इतकी झाली.

रिच व्हीलर कॉर्डोवामध्ये 'नॉर्थ 60 सीफूड्स' नावानं माशांवर प्रक्रिया करणारी एक छोटी फॅक्टरी चालवतात. एजगर या वर्षी तिथेच काम करत आहेत.

कॉर्डोवाचे स्थानिक लोक माशांवर प्रक्रिया करणाऱ्या फॅक्टरीत काम करण्याऐवजी मासे पकडण्यास अधिक प्राधान्य देतात

फोटो स्रोत, Jorge Luis Pérez Valery

फोटो कॅप्शन, कॉर्डोवाचे स्थानिक लोक माशांवर प्रक्रिया करणाऱ्या फॅक्टरीत काम करण्याऐवजी मासे पकडण्यास अधिक प्राधान्य देतात

रिच व्हीलर यांचं म्हणणं आहे की त्यांना काही अमेरिकन कर्मचाऱ्यांमुळे त्रास होतो. कारण ते अंमली पदार्थांचं सेवन करतात आणि भांडणं करत असतात.

ते पुढे सांगतात की मेक्सिकोमधून आलेल्या लोकांमुळे त्यांच्या व्यवसायात खूप वाढ झाली आहे. ते म्हणतात की मेक्सिकन लोकांशिवाय मी हे करू शकलो असतो, असं मला वाटत नाही. ते लोक नेहमीच वेळेवर कामावर येतात.

अनेक स्थलांतरित कामगारांसाठी आपल्या कुटुंबापासून प्रदीर्घ काळ इतक्या दूर अलास्कामध्ये राहून काम करणं सर्वात मोठं आव्हान असतं. एजगर यांच्या आई रोजा वेगा 18 वर्षांपासून सातत्यानं दरवर्षी अलास्कामध्ये येतात. त्या 67 वर्षांच्या आहेत.

त्यांना मेक्सिकोतील आपल्या वृद्ध आईची चिंता असते. रोजा यांनी सांगितलं की त्यांची आई खूपच वृद्ध आहे आणि त्या रोजा यांना इथे येण्यास मनाई करत आहेत.

रोजा वेगा म्हणतात की अलास्कामध्ये येताना त्यांच्यासमोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे त्यांच्या वृद्ध आईला तिथेच सोडून यावं लागतं

फोटो स्रोत, Jorge Luis Pérez Valery

फोटो कॅप्शन, रोजा वेगा म्हणतात की अलास्कामध्ये येताना त्यांच्यासमोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे त्यांच्या वृद्ध आईला तिथेच सोडून यावं लागतं
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी या निवडणुकीत स्थलांतरितांच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले आहेत की बाहेरून लोक अमेरिकेत कामासाठी, नोकऱ्यांसाठी येत असल्यामुळे अमेरिकन लोकांचा रोजगार हिरावला जातो आहे.

तर कमला हॅरिस म्हणाल्या की त्या सीमेवरील सुरक्षा वाढवून इमिग्रंट सिस्टमला व्यवस्थित करतील.

कॉर्डोवा शहराची लोकसंख्या एरवी 3 हजारांहून कमी आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही संख्या तिप्पट होते.

याबद्दल शहराचे महापौर डेव्हिड एलिसन म्हणतात की इथे स्थलांतरित कर्मचाऱ्यांकडे रोजगार हिरावून घेणारे असं न पाहता, त्यांच्याकडे स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे म्हणून पाहिलं जातं.

त्यांनी अनेक वर्षे कॅनरीमध्ये काम केलं आहे. त्यामुळे हे त्यांना अनुभवातून माहित आहे. ते म्हणतात की "जर तुम्ही अलास्कामधील एखाद्या वृत्तपत्रात जाहिरात दिली की तुम्हाला 250 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, तर तुमच्याकडे 20 हून अधिक अर्ज येणार नाहीत."

एलिसन सांगतात की "स्थलांतरित कामगार नसतील तर स्थानिक लोकांनी पकडलेले मासे लवकरच सडतील आणि वाया जातील. जर स्थलांतरित कामगारांचं मनुष्यबळ नसेल तर माशांवर प्रक्रिया देखील होऊ शकणार नाही. शिवाय जर मासे पकडण्यासाठी कोणीच नसेल तर कदाचित हे एक भूताचं शहर होईल."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.