जांभूळ शेतीतून लाखो कमावणाऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, ‘जांभूळ हे पीक अडचणीच्या काळातच शेतकऱ्यांना पैसा देतं’, जांभूळ शेतीतून लाखो कमावणाऱ्या शेतकऱ्याची गोष्ट
जांभूळ शेतीतून लाखो कमावणाऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची गोष्ट

जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील आलमगावचे शेतकरी प्रल्हाद येळेकर यांच्याकडे 20 एकर शेती आहे. 2014 साली त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत जांभूळ लागवडीचा निर्णय घेतला.

प्रल्हाद यांच्याकडे सध्या जांभळाची 300 झाडं आहेत. कापूस किंवा सोयाबीन ही जी पारंपरिक पिकं आहेत,या पिकांना जांभूळ हे पीक वरचढ किंवा जड ठरत असल्याचा शेतकरी प्रल्हाद येळेकर यांचा अनुभव आहे.