मुंबई लोकल ट्रेनमध्ये गरोदर महिलेला कसा प्रवास करावा लागतो?
मुंबई लोकल ट्रेनमध्ये गरोदर महिलेला कसा प्रवास करावा लागतो?
मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल ट्रेनमधून दररोज सुमारे 63 लाख प्रवासी प्रवास करतात. यात महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे.
परंतु लाखो प्रवाशांच्या तुलनेत महिलांसाठी उपलब्ध असलेली जागा अर्थात अपुरी असून क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने महिला यातून प्रवास करताना दिसतात.
गरोदर महिलांना याच गर्दीतून धक्का खात, कधी उभ्याने प्रवास करावा लागतो. मुंबई उपनगरात राहणाऱ्या काजल राजपूत यापैकीच एक आहेत.






