पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये महिला पत्रकाराला मारहाण झाल्याचं नेमकं प्रकरण काय?

व्हीडिओ कॅप्शन, पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये महिला पत्रकाराला मारहाण झाली, नेमकं घडलं काय?
पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये महिला पत्रकाराला मारहाण झाल्याचं नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर नुसार, 4 जुलैला स्नेहा बारवे या त्यांच्या युट्यूब चॅनलसाठी अतिक्रमणाच्या संदर्भात रिपोर्टिंग करण्यासाठी बाजारपेठेच्या परिसरात आल्या होत्या.

बाजारपेठ परिसरात झालेलं अतिक्रमण आणि बांधकाम यासंदर्भातील बातमीचे शूट करण्यासाठी त्या आणि त्यांचे सहकारी तिथे पोहोचले.

वार्तांकन करत असताना पाठीमागून आलेल्या 8 ते 9 जणांनी लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर मारहाण केली. त्या खाली पडल्यानंतरही पांडुरंग मोरडे यांनी त्यांच्या पाठीवर मारहाण केली.