'काम केलं तरच भाकरी द्यायचे, नाही तर शेठलोक लै हाणायचे' बीडमध्ये बालमुजरांना कसं वेठबिगारीत अडकवलं?

व्हीडिओ कॅप्शन, आईवडील कर्नाटकमध्ये, ठेकेदारांनी पैसे दिले आणि बदल्यात मुलं ठेवून घेतली... बीडमध्ये नेमकं काय घडलं?
'काम केलं तरच भाकरी द्यायचे, नाही तर शेठलोक लै हाणायचे' बीडमध्ये बालमुजरांना कसं वेठबिगारीत अडकवलं?

रायगडमधील कातकरी आदिवासींच्या शोषणाचा आणखी एक अध्याय समोर आलाय. हंगामी स्थलांतर करताना या कातकरी आदिवासींच्या मुलांना बीडमधले ठेकेदार ओलीस ठेवतात, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवतात याविषयी पोलीस तपास करतायत.

17 अल्पवयीन मुला-मुलींची बालमजुरी आणि वेठबिगारीतून सुटका झाली तेव्हा या प्रकरणाला वाचा फुटली. ही मुलं अनेक वर्षं कोणत्याही नोंदीशिवाय बालमजुरी करत होती, त्यामुळे हा बालतस्करीचा प्रकार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या मुलांनी बीबीसी मराठीकडे पहिल्यांदाच आपल्या कहाण्या मांडल्या आहेत.

रिपोर्ट- प्राजक्ता धुळप

व्हीडिओ शूट- नितीन नगरकर

व्हीडिओ एडिट- शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)