विधानभवनात कार्यकर्त्यांमधील राड्यावर महिला आमदार काय म्हणाल्या?

व्हीडिओ कॅप्शन, विधानभवनात कार्यकर्त्यांमधील राड्यावर महिला आमदारांनी नाराजी व्यक्त केली
विधानभवनात कार्यकर्त्यांमधील राड्यावर महिला आमदार काय म्हणाल्या?

पावसाळी अधिवेशनादरम्यान जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे विधिमंडळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

अशा प्रकारची मारामारी थेट राज्याच्या विधिमंडळात घडल्याने सर्व स्तरांतून तीव्र टीका होत आहे. मात्र, या प्रकाराचा महिला आमदारांवर नेमका काय परिणाम होतो? हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने काही महिला आमदारांशी संवाद साधला.