नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, पाहा कुणाला मिळाले कोणते खाते?

फोटो स्रोत, ANI
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे.
या नव्या सरकारचा शपथविधी 9 जून 2024 रोजी पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
या मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्यांबरोबरच अनेक नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खाते आहे, अमित शाह यांना गृह मंत्रालय आणि सहकार खाते देण्यात आले आहे. निर्मला सीतारामन या पुन्हा एकदा अर्थ मंत्री झाल्या आहेत.
नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक खाते आहे. एस. जयशंकर हे पुन्हा परराष्ट्र मंत्री बनले आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे कृषी खाते आहे.
एकूण 71 जणांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 36 राज्यमंत्री असतील.
महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांना मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय.
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कुणा-कुणाला स्थान मिळालंय, हे कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आणि राज्यमंत्री अशा विभागनिहाय पाहूया.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळं भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद कुणाला दिलं जाणार यावर चर्चा सुरू झाली आहे.
शिवराजसिंह चौहान आणि मनोहरलाल खट्टर यांची नावं अध्यक्षपदाच्या चर्चेत होती. पण त्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं आता कुणाचं नाव समोर येणार याची चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातल्या NDA आघाडीला 292 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर NDAने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
कॅबिनेट मंत्र्यांची पक्ष आणि राज्य आणि मतदारसंघनिहाय यादी खाली देत आहोत.
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 4 जणांना स्वतंत्र प्रभार देत राज्यमंत्री करण्यात आलंय. त्यात महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागा मिळालीय. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा सहभाग 'राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)' म्हणून मोदी सरकारमध्ये झालाय.
स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री यांची पक्ष, राज्य आणि मतदारसंघनिहाय यादी खाली देत आहोत.
राज्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्रातून तीन जणांना स्थान मिळालं आहे. रावेरच्या खासदार रक्षा खडसे, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभा खासदार रामदास आठवले यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे.
रामदास आठवले हे यापूर्वीही मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून सहभागी होते. मुरलीधर मोहोळ यांना मात्र खासदारकीच्या पहिल्या कार्यकाळात थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.
राज्यमंत्री यांची पक्ष, राज्य आणि मतदारसंघनिहाय यादी खाली देत आहोत.











