मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील मंत्र्यांकडे 'या' खात्यांची जबाबदारी

महाराष्ट्रातील नेते

नरेंद्र मोदी यांनी 9 जून 2024 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातल्या एनडीए आघाडीला 292 जागा मिळाल्या. त्यानंतर एनडीएने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी महाराष्ट्रातून कोण कोण असेल याची उत्सुकता सगळ्यांना होती. एकूण 6 नेत्यांना महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.

प्रेस इंफर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार नितीन गडकरी यांना रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्रालय देण्यात आलं आहे. तर पियुष गोयल यांना वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. यासोबतच आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

रामदास आठवलेंना पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्रालयाचं राज्यमंत्रिपद देण्यात आलंय.

रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली असून आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी उड् राज्यमंत्रिपद देण्यात आलंय.

नितीन गडकरी रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री

2014 आणि 2019 च्या दोन्ही मंत्रिमंडळात नितीन गडकरी सहभागी होते. रस्ते वाहतूक मंत्रालय त्यांच्याकडे होतं. या नव्या मंत्रिमंडळातही त्यांना संधी मिळाली आहे.

नितीन गडकरी

मोदी सरकारमध्ये पीयूष गोयल वाणिज्य मंत्री

2014 आणि 2019 या दोन्ही मंत्रिमंडळात पीयूष गोयल केंद्रीय मंत्री होते. रेल्वे मंत्रालयासारखं मोठं मंत्रालय त्यांनी सांभाळलं आहे. मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातही गोयल यांना कॅबिनेटमंत्रिपद मिळालं आहे.

यापूर्वी राज्यसभेतून संसदेत पोहोचणारे गोयल यंदा उत्तर मुंबई लोकसभा मतदारंसघातून विजयी होऊन संसदेत पोहोचले आहेत.

याआधी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे गोपाळ शेट्टी हे निवडून आले होते. पण भाजपानं यंदा धक्कातंत्र वापर त्यांचं तिकीट कापलं. त्यांच्या जागी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली.

आता पीयूष गोयल यांच्याकडे तेच खातं कायम ठेवण्यात आलं आहे.

पीयूष गोयल

प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची मोदी सरकारमध्ये वर्णी लागली आहे. त्यांना राज्य मंत्री म्हणून आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे.

प्रतापराव जाधव

रक्षा खडसेंना युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री

रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. रक्षा खडसे या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या सून आहेत.

रक्षा खडसेंना युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

रक्षा खडसे

रामदास आठवलेंचं राज्यमंत्रिपद कायम

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांचीही नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. आठवले यापूर्वीच्या दोन्ही मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री होते.

रामदास आठवलेंना पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्रालयाचं राज्यमंत्रिपद देण्यात आलंय.

रामदास आठवले

पहिल्यांदा खासदार बनलेले मुरलीधर मोहोळ केंद्रीय सहकार राज्यमंत्री

पुण्याचे पहिल्यांदाच खासदार बनलेले मुरलीधर मोहोळ यांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव करून ते संसदेत पोहोचले आहेत.

मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचं राज्यमंत्रिपद देण्यात आलंय.

मुरलीधर मोहोळ

2019च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे 23 खासदार संसदेत गेले होते. यावेळी मात्र महाराष्ट्रात भाजपची चांगलीच पीछेहाट झाली असून राज्यात भाजपचे नऊ खासदार निवडून आले आहेत.

मोदींच्या मावळत्या मंत्रिमंडळात भारती पवार (आरोग्य राज्यमंत्री), रावसाहेब दानवे (रेल्वे राज्यमंत्री) आणि कपिल पाटील (पंचायत राज राज्यमंत्री) होते. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या तिन्ही केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाला.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असणारा एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सात खासदार निवडून आले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला असला तरी या पक्षाचे राज्यसभा खासदारही आहेत. पण त्यांना कॅबिनेट मंत्रिपद न दिल्याने सध्यातरी अजित पवाराच्या पक्षाने इतर मंत्रिपद घेण्यास तुर्तास तरी नकार दिला आहे.

मोदी कॅबिनेट 3.0ची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे -