सारस पक्षी आणि मोहम्मद आरिफ यांची मैत्री अशी तुटली

व्हीडिओ कॅप्शन, सारस पक्षी आणि मोहम्मद आरिफ यांची मैत्री कशी तुटली?
सारस पक्षी आणि मोहम्मद आरिफ यांची मैत्री अशी तुटली

सारस पक्षी आणि मोहम्मद आरिफ यांची मैत्री आता तुटली आहे. उत्तर प्रदेशातली ही अनोखी मैत्री मध्यंतरी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली होती.

मात्र, उत्तर प्रदेशच्या वनविभागाने या सारस पक्ष्याला कानपूरच्या प्राणीसंग्रहालयात नेलंय.

तसंच, उत्तर प्रदेशच्या वनविभागाने मोहम्मद आरिफ यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावलीय.

दरम्यान, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश सिंह यादव यांनी यात राजकारण होत असल्याचा आरोप केलाय.

कारण, काही दिवसांपूर्वी स्वतः अखिलेश हे आरिफसोबत सारस पक्ष्याला पाहायला आले होते. दरम्यान, ही कारवाई आकसापोटी नसून माहिती मिळवण्यासाठी असल्याचं वनविभागाने म्हटलंय.

हेही पाहिलंत का?