मुंबईपासून हजारो किमी दूर चाबहार बंदरात भारताला रस का?
इराणमधल्या चाबहारमधील शाहीद बेहेश्ती बंदराचं पुढची 10 वर्ष संचालन करण्यासाठीचा करार भारताने इराणसोबत केलाय. इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड (IPGL) आणि पोर्ट्स अँड मॅरिटाईम ऑर्गनायझेशन (PMO) ऑफ इराणदरम्यान हा करार करण्यात आला. बंदराचं कामकाज आणि त्यासाठी लागणारी यंत्र खरेदी यासाठी IGPL 120 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट - JNPT आणि कांडला पोर्ट ट्रस्टच्या मदतीने या इंडिया पोर्ट्स ग्लोबलची स्थापना करण्यात आलीय.
ओव्हरसीज पोर्ट मॅनेजमेंट - म्हणजे देशाबाहेरील बंदराचा कारभार पाहण्यासाठीची भारताची ही पहिलीच वेळ आहे.
भारताला इराणमधल्या एका बंदराचं कामकाज चालवण्यात इतका रस का आहे? भारतासाठी हे बंदर कसं महत्त्वाचं ठरणार आहे?
समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - अमृता दुर्वे
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले






