उद्धव ठाकरे : 'मोदींनी लस बनवली, मग शास्त्रज्ञ काय गवत उपटत होते?'

उद्धव ठाकरे

"काल राजकारणातील हास्यजत्रेचा प्रयोग देवेंद्र फडणवीसांनी केला. कोव्हिडची लस मोदींनी तयार केली, असं त्यांनी म्हटलं होतं. मग संशोधक काय गवत उपटत बसले होते का, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

आज (19 जून) शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही आज शिवसेना वर्धापन दिनानिमित्त नेस्को ग्राऊंड येथे भाषण झालं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.

अडीच वर्षात तुम्ही दोनदाच मंत्रालयात गेले, हे शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. यापेक्षा आणखी काय पाहिजे? तुम्ही जे पेरलंय, तेच उगवणार.

तुम्ही आम्हाला घरगडी समजता? नोकर समजता? तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये प्रतिस्पर्धी उभे करत होतात? हे पक्षप्रमुखाचं काम नव्हे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं भाषण या बातमीत सविस्तर पाहूया.

उद्धव ठाकरेंचं भाषण

"देशात सर्वत्र हिंदू आक्रोश करत आहेत, याचा अर्थ तुम्ही देश चालवायचा समर्थ नाही. हिंदूंची फसगत झाली आहे. राजकारणातील शत्रू संपवण्यापेक्षा देशाचे शत्रू संपवा," असं ठाकरे यांनी म्हटलं.

ते म्हणाले, "57 वर्षांपूर्वी होता तसाच जोश अजूनही आहे. हॉल गच्च भरलेला आहे. ही निष्ठावंत शिवसैनिकांची गर्दी आहे. पण शहराच्या एका कोपऱ्यात गारदी जमलेले आहेत. गारदी शब्दाचा अर्थ असा आहे की पूर्वी पेशवे काळात गोंधळ घालण्यासाठी, वसुली करण्यासाठी काही भाडोत्री टोळ्या ठेवल्या जायच्या, त्यांना गारदी म्हटलं जायचं."

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

"काल मी मणिपूरचा उल्लेख केला, आज पुन्हा करतोय. मणिपूर पेटलेलं आहे, पण पंतप्रधान अमेरिकेला चालले आहेत. त्यांच्या लाचार मिंध्यांनी म्हटलं की सूर्यावर थुंकू नका. तुमच्यालेखी तो सूर्य असेल तर तो मणिपूरमध्ये का उगवत नाही."

"मणिपूरमध्ये कायद्याचं राज्य संपुष्टात येऊन तिथे सिरीयासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं निशिकांत सिंग यांनी ट्वीट केलेलं आहे. तिथे डबल इंजीन सरकार रुळावरून घसरलेलं आहे." असा आरोप ठाकरेंनी केला.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ठाकरे पुढे म्हणाले, "काल राजकारणातील हास्यजत्रेचा प्रयोग देवेंद्र फडणवीसांनी केला. कोव्हिडची लस मोदींनी तयार केली, असं त्यांनी म्हटलं होतं. मग संशोधक काय गवत उपटत बसले होते का? असे अंधभक्त आणि गुरू असल्यानंतर त्यांना कोणतं व्हॅक्सीन द्यावं हे बघितलं पाहिजे.

ठाकरे यांनी म्हटलं, "दरवर्षी आम्ही काँग्रेसबरोबर गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असा आमच्यावर आरोप करतात. काँग्रेस सत्तेत असताना इस्लाम खतरेमें है असं म्हटलं जात होतं. आता हे सत्तेवर असताना हिंदू खतरेमें असं म्हटलं जातं. हिंदूंना जनआक्रोश मोर्चा काढावा लागतो. मग हिंदुत्ववादी कोण आहेत? देशात सर्वत्र हिंदू आक्रोश करत आहेत, याचा अर्थ तुम्ही देश चालवायचा समर्थ नाही. हिंदूंची फसगत झाली आहे. राजकारणातील शत्रू संपवण्यापेक्षा देशाचे शत्रू संपवा."

"आज आयत्या बिळावर फणा काढून बसलो म्हणजे नागोबा झाला असं तुम्हाला वाटेल. पण भाजपला उपयोग आहे तोपर्यंत तुम्हाला दूध पाजतील, नंतर तुम्हाला टोपलीत घालून सोडून देतील. जाहिरातीवर जेवढा खर्च त्यांनी केला, तेवढा शेतकऱ्यांना दिला असता तरी त्यांना मदत झाली असती," असं ठाकरेंनी म्हटलं.

उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे

ते पुढे म्हणाले, "मी उमेद हरलेलो नाही, हरूच शकत नाही. पण मला नेहमी असं वाटतं की शिवसेनाप्रमुख आपल्याकडे पाहत आहेत, ते आपली परिक्षा घेत आहेत. आपण संकटाला तोंड कसं देतो हे ते पाहत आहेत. जिथे शिवसेना आहे, तिथे आव्हानं आहेत, आव्हानं आपल्यासाठी नवीन नाहीत. आपल्या मित्रांनीच आपल्याला आव्हान दिलं हे आपण मोडणारच. आपल्याला आव्हान देणारा शत्रू आपण यापुढे शिल्लक ठेवणार नाही."

"शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून गल्ल्यावर बसलो आणि चार नंबरला चहा दे रे, असं मी करणार नाही. तर तुमच्या सोबतीने काम करून आव्हान परतवून लावणार आहे. उद्या गद्दारीला एक वर्ष होईल. आपलं नाव चोरलं, पक्ष चोरला, वडील चोरायला निघाले होते. आज उद्धव ठाकरेला काय किंमत आहे, पण तरी अमित शाहांना महाराष्ट्रात यावं लागतं, सतत उद्धव ठाकरेचा जप करावा लागतो. माझ्यापेक्षा रामाचा जप केला, तर तुम्हाला राम पावेल. तुम्ही उद्धवग्रस्त का झाले आहात," असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

"अजूनही काही जण आपल्यातून बाहेर जात आहेत. कालही गेले. ते गेल्यानंतर माध्यमांनी लगेच उद्धव ठाकरेंना धक्का म्हणून दाखवू नये. जपानलाही रोज धक्का बसतो, तरी तो उभे राहतात. अस्वलाचा एक केस उपटला म्हणून तो काय टकला होत नाही. म्हणून जे कुणी बिकाऊ आहेत, त्यांना तुम्ही घेऊन जा. मला काही फरक पडणार नाही. त्यांनी आमचं पीक कापून नेलं असेल, पण शेती आमच्याकडेच आहे. जास्त गडबड केली तर आम्ही तुम्हाला नांगरून टाकू," असं ते म्हणाले.

एकनाथ शिंदेंचं भाषण

उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर काही वेळातच एकनाथ शिंदेंचं भाषण झालं.

यावेळी ते म्हणाले, "गेल्या वर्षी 20 जून रोजी राज्यात क्रांतीला सुरुवात झाली. 30 तारखेला राज्यात शिवसेना भाजप युतीची अधिकृत सत्ता स्थापन केली.

एकनाथ शिंदे

"त्यांचं (उद्धव ठाकरेंचं) भाषण मी कालही ऐकलं, आजही ऐकलं. तेच टोमणे, तीच कॅसेट. त्यांना स्क्रिप्ट रायटर बदलायला तरी सांगा. पण आम्ही आरोपाला उत्तरं कामाने देणार. किती केस झाल्या तुमच्यावर? हा एकनाथ शिंदे शाखाप्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झाला, याच्यामागे मेहनत, कष्ट, रक्ताचं पाणी आहे."

"एकनाथ शिंदेने कर्ज काढून निवडणुका लढवल्यात. वयाच्या 21 व्या वर्षी मी 40 दिवस बेळगावच्या जेलमध्ये होतो. तुमची कोल्हेकुई केव्हापर्यंत सुरू असते. जेव्हा वाघ डरकाई फोडत नाही तोपर्यंत. वाघ जंगलात आल्यानंतर सगळे कुठे पळतात ते माहिती आहे ना. उठाव करायला वाघाचं काळीज लागतं," असं ते म्हणाले.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, "20 तारखेपासून गद्दार दिवस म्हणून साजरा करा, असं काल म्हणाले. अरे तुम्हीच केलीत गद्दारी. फक्त तारीख विसरला. सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेबांचा विचार सोडले. तुमच्या पोटातलं ओठात निघालं."

"गद्दार शिंदे काय काय घाणेरडे आरोप करतात. पण यामुळे तुम्हाला सहानुभूती मिळणार नाही. कारण ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांसोबत, राज्यातल्या मतदारांसोबत धोका केला, त्यांना सहानुभूती मिळणार नाही."

"जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर 50 आमदार, 13 खासदार आणि शेकडो, हजारो कार्यकर्ते इथं दिसले असते का? त्यांच्याकडे आहे तोपर्यंत चांगलं, गेला की कचरा. पण एक दिवस तुमचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही," असं शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे

"सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूनं कसा आहे, हे सांगण्यासाठी आटापिटा चाललाय. किती खोटारडेपणा करायचा? किती दिशाभूल करायची? पण आता तुम्हाला जनता साथ देणार नाही.

मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून शेती करायला जातात, असे खोटे आरोप करतात. शेतकऱ्याच्या मुलानं हेलिकॉप्टरमध्ये बसू नये का? असा प्रश्न त्यांनी केला.

"त्यांनी अडीच वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे दोन कोटी वाटले. या पठ्ठ्यानं 11 महिन्यात 75 कोटी वाटले. अडीच वर्षात तुम्ही दोनदाच मंत्रालयात गेले, हे शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. यापेक्षा आणखी काय पाहिजे? तुम्ही जे पेरलंय, तेच उगवणार."

"तुम्ही आम्हाला घरगडी समजता? नोकर समजता? तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये प्रतिस्पर्धी उभे करत होतात? हे पक्षप्रमुखाचं काम नव्हे," अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

"नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राम मंदिराचं जानेवारीत उद्घाटन होणार आहे. 370 कलम हटवून टाकलं. ज्या लाल चौकात तिरंगा जाळत होते, तिथं मी तिरंगा फडकताना पाहिला, मला अभिमान वाटला. त्याच लाल चौकात एकनाथ शिंदेंचे पोस्टर झळकले होते."

"आम्ही बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्यांसोबत युती केली? मग गद्दार कोण, विश्वासघातकी कोण?मोदी आणि शहा साहेबांना अहमदशाह, अब्दाली अशा उपमा दिल्या. अरे तुम्ही कुठे ते कुठे. जेव्हा नोटीस आल्या तेव्हा मोदींना भेटायला गेले."

"आम्हाला सगळं माहिती आहे. बाळासाहेबांची पुण्याई आहे, पण आपल्या मर्यादेत राहा, आपल्या कुवतीमध्ये राहा. मणिपूर काय, मोदी साहेबांनी पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राईक करुन दाखवली."

ते पुढे म्हणाले, "मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, असं राजकारण तुम्ही सुरू करता. पण मुंबईकर सूज्ञ आहेत. गिरणी कामगारांनी शिवसेनेला मोठं केलं. जेवढे गिरणी कामगार आहेत, त्या सगळ्यांना घरं देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे."

"कोव्हिडमध्ये माणसं मरत होती, आणि तुम्ही पैसे बनवत होता. त्याचा हिशेब तुम्हाला द्यावाच लागेल. येणारी प्रत्येक निवडणूक आपण शिवसेना-भाजपा महायुती म्हणून लढवणार आहोत. म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उद्यापासून आपण स्वाभिमान दिन, क्रांती दिन, उठाव दिन शाखाशाखांमध्ये साजरा करुया आणि या गद्दारांना उत्तर देऊ, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 3

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)