महाराष्ट्रातल्या या गावात 700 वर्षांपासून कापडी कचऱ्यातून मौल्यवान कागद कसा बनतो?

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्रातील या गावात कापडाच्या कचऱ्यापासून कागद तयार करतात
महाराष्ट्रातल्या या गावात 700 वर्षांपासून कापडी कचऱ्यातून मौल्यवान कागद कसा बनतो?

जगभरात दरवर्षी अंदाजे 9 कोटी टनापेक्षा जास्त कपड्यांचा कचरा निर्माण होतो. भारताचाही त्याच मोठा वाटा आहे. हे कापड नष्ट करणं एक मोठं संकट ठरतं. परिणामी पर्यावरणालाही धोका निर्माण होतो. पण छत्रपती संभाजीनगरच्या जवळ असलेल्या कागझीपुऱ्यानं 700 वर्षांपूर्वीच यावर तोडगा शोधून ठेवला आहे. याठिकाणी हस्तनिर्मित कागद तयार केला जातो.

कागदाच्या या व्यवसायावरूनच त्याचं नाव कागझीपुरा असं पडलं. काळाच्या ओघात हा व्यवसाय आणि कला नामशेष होत आहे. पण काही संस्था ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आजही इथं अशाप्रकारे कागद तयार केला जातो. याचं योग्य संवर्धन आणि पुनरुज्जीवन केलं तर कापडाच्या कचऱ्याच्या समस्येवर शाश्वत उपाय सापडू शकतो. शिवाय कागदासाठी होणारी झाडांची कत्तलही वाचू शकते.

रिपोर्ट - नितीन सुलताने

शूट-एडिट - दानिश आलम