'ही' बाहुली सोशल मीडियावर इतकी व्हायरल का होतेय?

व्हीडिओ कॅप्शन, ही Labubu बाहुली सोशल मीडियावर इतकी व्हायरल का होतेय?
'ही' बाहुली सोशल मीडियावर इतकी व्हायरल का होतेय?

छोटू बॉडी, मोठ्ठाले डोळे, टोकदार उभे कान, आणि बाहेर निघालेले राक्षसी दात - लबुबू नावाची ही बाहुली तुम्ही कधी सोशल मीडियावर पाहिली असेल तर कधी कुठल्या सेलिब्रिटीच्या बॅगवर.

आणि तिची सध्या जगभरात इतकी क्रेझ आहे की ती विकत घेण्यासाठी लोक तासन् तास स्टोरबाहेर रांगा लावतायत, कुणी टिकटॉकवर तर कुणी इन्स्टावर मिरवतंय.

PopMart या खेळणी बनवणाऱ्या चिनी कंपनीच्या या प्रोडक्टने लोकांना असं वेड लावलंय की युकेमध्ये तर त्यावरून दुकांनांमध्ये भांडणंही झाली.