मोहक की विचित्र बाहुल्या, चीनच्या लबूबू बाहुल्यांनी कसं जिंकलं जग?

मोहक की विचित्र बाहुल्या, चीनच्या लबूबू बाहुल्यांनी कसं जिंकलं जग?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, फॅन वांग आणि ॲडम हँकॉक
    • Role, बीबीसी न्यूज, सिंगापूर

तुम्हाला त्या गोंडस, कुरूप किंवा निव्वळ विचित्रही वाटत असतील, मात्र तुम्ही जगभरात प्रसिद्ध झालेल्या या बाहुल्यांबद्दल ऐकलं असेलच. या बाहुल्या म्हणजे लबूबू .

चीनची खेळणी तयार करणारी कंपनी पॉप मार्टनं ही बाहुली तयार केली आहे. सुरुवातील राक्षस म्हणून एल्फसारखा प्राणी दिसणारी ही बाहुली तयार करण्यात आली होती. ती आता प्रचंड व्हायरल झाली असून जगभरातील लोक तिची खरेदी करत आहेत.

अनेक सेलिब्रिटिंना या बाहुलीची भुरळ पडली आहे. त्यात रिहाना, ड्युआ लिपा, किम कार्दिशियन आणि ब्लॅकपिंक्स लिसा अशा अनेकांचा समावेश आहे.

शांघायपासून ते लंडनपर्यंत सर्वसामान्यांनाही या बाहुलीनं वेड लावलं आहे.

ही बाहुली विकत घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याच्या बातम्या आल्या आहेत. काहीवेळा तर लोकांमध्ये हाणामारीदेखील झाली आहे.

लबूबू बाहुल्या

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लबूबू बाहुल्या

"एवढ्या प्रयत्नांनंतर ही बाहुली मिळते तेव्हा तुमच्यात काहीतरी जिंकल्याची भावना निर्माण होते," असं लबूबू बाहुल्यांच्या चाहत्या असलेल्या फिओना झांग म्हणतात.

जगभरात लबूबू बाहुल्यांचं वेड आणि आकर्षण वाढल्याचा फायदा पॉप मार्ट कंपनीला झाला आहे. गेल्यावर्षी त्यांचा नफा जवळपास तिपटीनं वाढला आहे.

काही जणांना वाटतं की, यामुळे चीनच्या सॉफ्ट पॉवरला (सांस्कृतिक, कलात्मक इत्यादी गोष्टींमुळे निर्माण होणारा प्रभाव) देखील ऊर्जा मिळाली आहे.

कोरोनाचं संकट आणि पाश्चात्य देशांबरोबरच्या तणावाच्या संबंधांमुळे झालेल्या नकारात्मक वातावरणात, यामुळे अनुकूल वातावरण निर्मितीला फायदा होतो आहे.

पण हे सर्व कसं झालं? ते जाणून घेऊ.

लबूबू बाहुल्या म्हणजे नेमकं काय?

हा प्रश्न अजूनही अनेकांना पडत आहे. ज्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, त्यांनाही या बाहुल्यांसाठीच्या वेडाचं कारण नीट समजावता येणार नाही.

लबूबू हे एकाचवेळी काल्पनिक पात्र आणि ब्रँड दोन्ही आहे. या शब्दाला विशिष्ट अर्थ नाही. हाँगकाँगमधील कलाकार केसिंग लंग यांनी 'द माँन्स्टर्स' नावाच्या मालिकेंतर्गत काही खेळणी तयार केली होती. त्यातील एका पात्राचं नाव लबूबू आहे.

 बाहुल्या

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लबूबू बाहुल्यांच्या विश्वात इतर पात्रांचा समावेश आहे, ज्यामुळे त्यांच्या बाहुल्यांना प्रेरणा मिळाली आहे

व्हेनाईलचे चेहरे आणि मऊ शरीर असलेल्या या बाहुल्यांचा एक विशिष्ट लूकही आहे. टोकदार कान, मोठे डोळे आणि मोजून नऊ दात दिसणारं खट्याळ हास्य हा लूकच या बाहुल्यांची ओळखही आहे.

या बाहुल्यांबाबत इंटरनेटवर मतमतांतरं आहेत. त्यामुळं गोंडस की विचित्र याबाबत चर्चा सुरुच आहे.

कंपनीच्या अधिकृत वेबसाईटनुसार, "लबूबू हे एक दयाळू आणि नेहमीच मदत करण्याची इच्छा असणारं पात्र आहे. मात्र अनेकदा त्याच्या उलट होतं."

लबूबू बाहुल्या 'द मॉन्टर्स' च्या अनेक मालिकांमध्ये दिसल्या आहेत. यात 'बिग इनटू एनर्जी', 'हॅव अ सीट', 'एक्सायटिंग मॅकरॉन' आणि 'फॉल इन वाइल्ड' यांचा समावेश आहे.

लबूबू ब्रँडमध्ये या मालिकांच्या विश्वातील इतरही पात्र आहेत. त्यात आदिवासी नेता झिमोमो, तिचा प्रियकर टायकोको आणि तिचा मित्र मोकोको.

या बाहुल्यांबाबत फार माहिती किंवा आवड नसलेल्यांना लवकर यातला फरक कळतही नाही. पण याच्या चाहत्यांना मात्र लगेच समजतं.

लबूबू बाहुल्यांची लोकप्रियता एवढी वाढली आहे की, या कुटुंबातील इतर पात्रांच्या बाहुल्यांचीही प्रचंड विक्री होऊ लागली आहे.

लबूबूची विक्री कोण करतं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पॉप मार्ट कंपनीच्या उत्पादनांमध्ये सर्वाधिक विक्री ब्लाईंड बॉक्सची व्हायची. त्यात ग्राहकांनी बॉक्स विकत घेतल्यानंतर नेमकं काय विकत घेतलं आहे हे कळायचं. कंपनीनं लबूबूच्या हक्कांसाठी केसिंग लंगशी करार केल्यानंतर काही वर्षे याप्रकारे विक्री केली.

पण कंपनी सुरू केल्यानंतर जवळपास दहा वर्षांनी 2019 मध्ये वांग निंग यांनी पॉप मार्ट हे स्टोअर सुरू केलं. ब्लाईंड बॉक्स यशस्वी झाल्यानंतर 2016 मध्ये पॉप मार्टनं खेळण्याची पहिली मालिका आणली.

त्यात मॉली बाहुल्यांची विक्री झाली. या लहान मुलांसारख्या असतात. हाँगकाँगमधील केनी वाँग या कलाकारानं त्या तयार केलेल्या आहेत.

मात्र लबूबूच्या विक्रीमुळे पॉप मार्टच्या प्रगतीला चालना मिळाली. डिसेंबर 2020 मध्ये कंपनीनं हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजवर शेअरची विक्री सुरू केली. गेल्या वर्षी पॉप मार्ट कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 500 टक्क्यांहून अधिक तेजी आली आहे.

पॉप मार्ट आता एक मोठी रिटेलर कंपनी बनली आहे. कंपनीचे जगभरात 2,000 हून अधिक व्हेंडिंग मशीन किंवा 'रोबोशॉप' आहेत.

30 हून अधिक देशांमध्ये तुम्ही प्रत्यक्ष स्टोअरमधून, किंवा ऑनलाइन स्वरुपात लबूबू बाहुल्या खरेदी करू शकता. यात अमेरिका आणि युकेपासून ऑस्ट्रेलिया ते सिंगापूरपर्यंतच्या देशांचा समावेश आहे.

अर्थात यापैकी अनेक देशांनी लबूबू बाहुल्यांसाठी असलेल्या प्रचंड मागणीमुळे त्यांची विक्री थांबवली आहे.

चीनबाहेर या बाहुल्यांचा मोठा खप आहे. 2024 मध्ये कंपनीच्या एकूण महसूलात चीनबाहेर झालेल्या विक्रीचा 40 टक्के वाटा होता.

लाबुबू बाहुल्या

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पॉप मार्टनं 2010 मध्ये बीजिंगमध्ये त्यांचं पहिलं स्टोअर सुरू केलं होतं

चीनच्या कस्टम अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांत 70,000 हून अधिक लबूबू बाहुल्या जप्त केल्याचं सांगितलं. यावरुन त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.

अर्थात या बाहुल्यांना असलेल्या मागणीत एका रात्रीत वाढ झालेली नाही.

लबूबू बाहुल्या जगभरात कशा पोहोचल्या?

लबूबू बाहुल्यांची लोकप्रियता सुरुवातीला चीनपुरतीच मर्यादित होती. पण 2022 च्या शेवटी जगभरातील देश कोरोनाच्या संकटातून बाहेर पडताच या बाहुल्या लोकप्रिय होण्यास सुरुवात झालीस असं अ‍ॅश्ले ड्युडेअरनॉक सांगतात. अ‍ॅश्ले चोझॅन संशोधन संस्थेच्या संचालक आहेत.

त्यांच्या मते, "कोरोनाच्या संकटानंतर चीनमधील अनेक जणांना भावनिक आधार हवा होता. लबूबू बाहुल्या हे खूपच मोहक, पण गोंधळात टाकणारं पात्र होतं. जणू परिपूर्णते विरोधात भावना मांडणारी ती बाहुली होती."

चीनच्या अत्यंत मोठ्या इंटरनेटच्या जाळ्यात अनेक व्हायरल ट्रेंड येतात. पण ते जगभरात पसरत नाहीत. पण लबूबू बाहुल्यांचा ट्रेंड जगभरात पोहोचला. चीनच्या शेजारील आग्नेय आशियात या बाहुल्यांची लोकप्रियता झपाट्यानं पसरली.

फियोना कॅनडात राहतात. त्या म्हणतात की, 2023 मध्ये फिलिपिन्समधील मित्रांकडून त्यांनी पहिल्यांदा लबूबूबद्दल ऐकलं. त्यानंतर त्यांनी या बाहुल्या विकत घेण्यास सुरुवात केली.

त्या म्हणतात की, "त्यांना या बाहुल्या खूपच गोंडस वाटतात. मात्र या बाहुल्यांची वाढती लोकप्रियता हे प्रमुख आकर्षण आहे."

त्या पुढे म्हणतात की, "ही बाहुली परवडणारीदेखील आहे. अर्थात या बाहुल्यांच्या लोकप्रियतेमुळे सेकंड-हँड बाजारातील त्यांच्या किंमती वाढल्या आहेत."

फियोना म्हणतात की, बहुतांश लबूबू बाहुल्यांची मूळ किंमत 25 कॅनेडियन डॉलरपासून (18 डॉलर्स, 14 पौंड) ते 70 कॅनेडियन डॉलर होती. त्यांच्या ओळखतील बुहुतांश जणांना ती किंमत 'परवडणारी' होती.

लबूबू बाहुल्यांची लोकप्रियता एप्रिल 2024 मध्ये वाढली. थायलंडमध्ये जन्मलेल्या के-पॉप सुपरस्टार लिसा यांनी इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या लबूबू बाहुल्यांचे फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर या बाहुल्यांची लोकप्रियता वाढली. त्यानंतर यावर्षी जगभरातील सेलिब्रिटींनी या बाहुल्यांना जगभरात आणखी लोकप्रिय केलं.

बाहुल्या

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लबूबू पेंडंट सर्वात लोकप्रिय आहेत

फेब्रुवारी महिन्यात गायिका रिहानाचा एक फोटो आला होता. त्यात तिच्या लुई व्हिटॉन बॅगला लबूबू बाहुली लावलेली होतं. तर एप्रिल महिन्यात इन्फ्लुएन्सर किम कार्दिशियननं तिचं 10 लबूबू बाहुल्यांचं कलेक्शन इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं.

मे महिन्यात इंग्लंडचा माजी फुटबॉल कॅप्टन सर डेव्हिड बेकहॅम यांनंही इन्स्टाग्राम अकाउंटवर लबूबूबरोबरचा फोटो पोस्ट केला. ही बाहुली त्याला मुलीनं दिली होती.

आता या बाहुल्या सर्वत्र दिसतात.

लबूबू बाहुल्यांच्या वेडामागचं काय कारण?

सोप्या भाषेत सांगायचं, तर माहिती नाही. जसं बहुतांश व्हायरल ट्रेंडबद्दल सांगणं कठीण असतं, तसंच लबूबू बाहुल्यांच्या आकर्षणाविषयी सांगणं कठीण आहे.

त्यांच्या बद्दलचं आकर्षण हे, टायमिंग, उत्पादनांबद्दलची निवड आणि अचानक मिळणारी लोकप्रियता म्हणजे इंटरनेट यांचा परिणाम आहे.

या बाहुल्यांच्या लोकप्रियतेमुळे चीन नक्कीच खूश आहे. शिनहुआ ही चीनची सरकारी वृत्तसंस्था आहे. या वृत्तसंस्थेचं म्हणणं आहे की, "लबूबूमधून चीनी सर्जनशीलतेबद्दलचं आकर्षण, गुणवत्ता आणि जगाला समजून शकेल. यातून सर्वांना एक "छान चीन" (कूल चायना) पाहण्याची संधी मिळते."

क्रिस परेरा इम्पॅक्ट या कन्सल्टन्सी कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

त्यांच्या मते, "ही उत्पादनं इतकी उत्तम आहेत की, ती चीनमधील आहेत, याची कोणालाही पर्वा नाही."

बाहुल्या

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शांघायमधील एक पॉप मार्ट स्टोअर

दरम्यान, सोशल मीडियावर लबूबूच्या फॉलोअर्सची संख्या वाढते आहे.

डेसमंड टॅन, पॉप मार्टच्या विविध खेळण्यांच्या मालिकेतील पात्रं गोळा करतात. त्यात लबूबूचा समावेश आहे.

बऱ्याच काळापासून लबूबू बाहुल्या विकत घेत आहेत. ब्लाईंड बॉक्स विकत घेण्यापूर्वी ते जोरात हलवून पाहतात.

डेसमंड म्हणतात की, जवळपास 10 बॉक्स विकत घेतल्यानंतर त्यांना एक चेसर मिळतं. चेसर पॉप मार्टच्या खेळण्यांच्या स्पेशल एडिशनमधील काही पात्रं आहेत.

"मला एक किंवा दोन प्रयत्नात ते मिळालं, तर मी खूपच आनंदी असतो!" असं ते सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)