गुगल डायलर: पुन्हा आपल्याला जुनी कॉलिंग स्क्रीन परत आणता येईल का? त्यासाठी काय करायचं?

गेल्या काही दिवसात एक महत्त्वाचा बदल आपल्याला अँड्रॉइड फोनमध्ये पाहायला मिळाला. तो म्हणजे डायलर सेटिंग्स पूर्ण बदलल्या. त्यामुळे बहुतेकांना तर सुरुवातीला हेच वाटलं की आपला फोन हॅक झाला की काय? नंतर हे कळलं की या डायलर सेटिंग्स गुगलकडूनच बदलण्यात आल्या आहेत. तेव्हा मात्र सर्वांचा जीव भांड्यात पडला.
गुगलने मटेरियल 3 एक्सप्रेसिव्ह डिजाइन रिलीज केले. ज्यामुळे या सेटिंग्स बदलल्या गेल्या आहेत. याचा स्क्रोलिंग स्क्रीनवर परिणाम झाला. त्यामुळे इंटरफेस पूर्णपणे बदलला आहे. अनेक वेळा फोन रिसिव्ह करणे किंवा रिजेक्ट करण्यासाठी काय करायचं ते लक्षात येत नाही.
आता, प्रश्न हा आहे की जर तुम्हाला हा ले आउट आवडला नाही तर काय करायचं? पण जर तुम्हाला हा नवा इंटरफेस नको असेल तर जुनी सेटिंग्स परत आणण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे.
हे बदल का झाले, गुगलने यात नवीन काय दिला आणि आपण आपल्या आवडीनुसार नेमकं काय करू शकतो तो आपण पाहू.
काय आहेत बदल?
मे महिन्यात गुगलने सांगितलं होतं की ते 'मटेरियल 3 एक्सप्रेसिव्ह' नावाचे अपडेट आणणार आहेत. गेल्या काही वर्षांत झालेल्या अपडेट्सपैकी हे सर्वांत मोठे असेल असे कंपनीने म्हटले होते.
या बदलामुळे फोनचे सॉफ्टवेअर आणि डिस्प्ले हे वापरासाठी अधिक सोपे, जलद आणि सुलभ होईल असे कंपनीने म्हटले होते.

फोटो स्रोत, Google
गुगलने सांगितलं की नव्या डिस्प्ले सेटिंग्समध्ये अनेक गोष्टी बदलतील जसं की नोटिफिकेशन, कलर थीम, फोटो, जीमेल आणि वॉच.
जुनी कॉलिंग स्क्रीन परत आणण्यासाठी काही बटण आहे का?
जर आपल्याला जुनी सेटिंग हवी असेल तर एखादं बटण आहे का? असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत. परंतु गुगलच्या ऑफिशियल पेजवर असं काही बटण किंवा पर्याय उपलब्ध नाही ज्यात केवळ एका क्लिकवर तुम्ही जुन्या सेटिंग्स आणू शकाल.
गुगलचे अधिक लक्ष नव्या फीचर्सवर आहे, ज्यात तुम्हाला अॅक्सेसिबिलिटी आणि परफॉर्मन्समध्ये सुधारणा उपलब्ध करुन दिली जाईल.
पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जुन्या सेटिंग्स आवडत असतील तर काहीच करता येणार नाही.
डायलर कसे बदलायचे ?
आता आपला प्रश्न हा आहे की, ही जुनी सेटिंग परत कशी आणायची. तर पुढे दिलेल्या फोटोंमध्ये सेंटि्गसमध्ये जाऊन बदल करण्याच्या स्टेप्स सांगितल्या आहेत.
जर तुम्ही ओकेवर टॅप केलं तर जुनी सेटिंग पुन्हा येईल आणि नवी सेटिंग निघून जाईल.




वर दिलेल्या फॉर्मॅटनुसार सेटिंग्समध्ये जाऊन तुम्हाला बदल करता येतील. त्यासाठी, तुम्हाला हे अॅप डिलीट करून जुन्या फॅक्टरी व्हर्जनवर परत जायचे आहे का असं विचारलं जाईल.
तुम्ही ओके वर टॅप करताच, फोनमधून नवीन अपडेट काढून टाकले जाईल आणि अॅप त्याच्या जुन्या व्हर्जननुसार पूर्ववत होईल.
डिफॉल्ट फोन अॅप पाहा आणि गरज असेल तर बदला
या व्यतिरिक्त आणखी हे देखील पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत.
सेटिंग्समध्ये बदल होतात कारण आपण जे डिफॉल्ट अॅप घेतलेले असेल त्यात अपडेट होतात आणि त्यानुसार हे बदल दिसतात. अँड्रॉइड हेल्प गाईड सांगत की सेटिंग्स - अॅप्स - डिफॉल्ट अॅप्स - फोन अॅप मध्ये जाऊन आपल्या आवडीनुसार अॅप निवडा.
असं केल्यावर तुम्हाला कॉलिंग स्क्रीन त्याच अॅपची दिसेल जे तुम्ही डिफॉल्ट म्हणून निवडले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जर गुगलचा फोन वापरणार असाल तर हेल्प पेजमध्ये हे स्पष्टपणे म्हटले आहे की, जेव्हा अॅपकडून निवडीसाठी सूचना येईल तेव्हा 'सेट अॅज डिफॉल्ट' असेच निवडा. हवं तर ते नंतर सेटिंग्स डिफॉल्ट अॅपमध्ये देखील बदलता येऊ शकतं.
अँड्रॉइड सिस्टिमध्ये कोणतेही अॅप डिफॉल्ट डायलरचा रोल घेऊ शकतं. पुन्हा कॉलिंगशी संबंधित सर्व कामे याच अॅपकडून मॅनेज केली जातात. त्याचे हेच कारण आहे की विविध फोनवर कॉलिंग स्क्रीन वेगवेगळी दिसते.
स्टेबल चॅनलवरचा पर्याय निवडा
नवे व्हिज्युअल बदल हे आधी बीटा बिल्डमध्ये येतात. गुगलचे डेव्हलपर पेजेस सांगतात, की तुमचे डिव्हाईस अँड्रॉइड बीटा फॉर पिक्सल असे आहे तर त्यात सातत्याने ओटीए बीटा अपडेट मिळतात.
जेव्हा कोणतेही स्टेबल रिलीज येते तेव्हा एका निर्धारित वेळेत तुम्ही बीटातून बाहेर पडून येणारे नवीन बीटा अपडेट वेळीच रोखू शकतात.
जर तुम्ही बीटावर आहात तर स्टेबल चॅनेलवर परत या. त्यामुळे हे इंटरफेसमधील हे बदल उशिरा येतील आणि नवे डिजाईन लगेच दिसणार नाही.
अपडेटचे कंट्रोल तुमच्या हाती ठेवा
गुगल प्ले हेल्पमध्ये असं सांगितलं आहे की जर तुम्ही ऑटो अपडेट सेटिंग तुमच्या गरजेप्रमाणे निवडू शकतात.

स्टेप्स अशा आहेत -
गुगल प्ले - प्रोफाइल आयकॉन - सेटिंग्स - नेटवर्क प्रेफरन्स - ऑटो - अपडेट अॅप्स
जर तुम्ही या ठिकाणी 'डोंट ऑटो अपडेस्' निवडले तर आता जे अॅप आले आहेत ते तुमच्या स्क्रीनवर काहीच परिणाम करणार नाहीत.
इथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की आपल्या डेटा सेफ्टीसाठी अपडेट महत्त्वाच्या असतात. समजा तुम्ही ऑटो अपडेट बंद केले तर तुम्हाला दरवेळी जाऊन त्यावर मॅन्युअली अपडेट करत राहावे लागेल.
जर जुनी कॉलिंग स्क्रीन आली तर कॉल हिस्ट्री डिलिट होईल का?
काही युजर्सला ही भीती वाटत आहे की जुने व्हर्जन घेतले तर त्यांच्याजवळ असलेली कॉल हिस्ट्री पूर्णपणे डिलिट होऊन जाईल. परंतु गुगलच्या ऑफिशियल पेजेसवर याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
तरी देखील या ठिकाणी आपण असं मानू शकतो की गुगलवर तुम्ही कॉल हिस्ट्री तुम्हाला मिळू शकेल. परंतु या गोष्टीची सर्व गॅरंटी केवळ गुगलच घेऊ शकतं.
एका युजरने बीबीसी हिंदीला म्हटलं आहे की त्यांनी नवीन अपडेट अनइन्स्टॉल केले आणि त्यांनंतर त्यांची कॉल हिस्ट्री किंवा डेटा मिटला नाही. सर्व डेटा पूर्वीसारखाच आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











