क्रिकेट वर्ल्ड कप : स्पर्धेतले दहा संघ कोणते आहेत?

ICC World Cup Trophy

फोटो स्रोत, Getty Images

वन डे विश्वचषकासाठी क्रिकेट चाहते सज्ज झाले आहेत. यंदा विश्वचषकात स्थान मिळालेल्या दहा संघांची मोर्चेबांधणी कशी आहे, पाहुयात.

28 सप्टेंबरची मुदत संपेपर्यंत हे संघ जाहीर करायचे होते.

यानंतर संघात काही बदल करायचे असतील, तर त्यासाठी या स्पर्धेसाठीच्या आयसीसीच्या तांत्रिक समितीकडून परवानगी घ्यावी लागेल.

एखादा खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला किंवा अन्य काही अपरिहार्य कारणामुळे उर्वरीत सामन्यांत खेळू शकत नसेल, तर आयसीसीची परवनागी घेतल्याशिवाय बदली खेळाडूचा समावेश करता येत नाही.

विश्वचषकासाठी भारतीय संघात कुणाचा समावेश?

विश्वचषकाचं यजमानपद यंदा भारताकडे असून, रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया या स्पर्धेत खेळते आहे.

भारतीय संघात रोहितशिवाय शार्दूल ठाकूर, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर अशा एकूण चार मुंबईकर खेळाडूंचा समावेश आहे.

भारतीय संघ

भारतानं याआधी 1983 साली कपिल देवच्या नेतृत्त्वाखाली खेळताना आणि 2011 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना पुरुषांच्या वन डे विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं होतं.

भारताच्या या संघाचं प्रशिक्षकपद सांभाळण्याची जबाबदारी माजी कर्णधार राहुल द्रविडकडे आहे.

पाकिस्तानचा संघ कसा आहे?

बाबर आझमच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघावर यंदा सर्वांची विशेष नजर राहील.

BBC

जवळपास सात वर्षांनी पाकिस्तानची क्रिकेट टीम भारतात खेळण्यासाठी आली आहे.

हैदराबाद, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता इथे पाकिस्तानी संघाचे सामने खेळवले जाणार आहेत.

इंग्लंड पुन्हा वर्ल्ड कप जिंकेल?

इंग्लंडनं 2019 साली मायदेशात खेळताना पहिल्यांदाच आयसीसी वन डे विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यावेळी इयॉन मॉर्गननं टीमचं नेतृत्तव केलं होतं तर जोस बटलर उपकर्णधार होता.

आता बटलरच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडचा संघ आपलं विजेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्न करेल.

BBC

याआधी केवळ वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांनीच सलग दोन वन डे विश्वचषक जिंकण्याची करामत साधली होती.

ऑस्ट्रेलियानं आजवर पाच वेळा वन डे विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं आहे. यंदा पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ते खेळताना दिसतील.

BBC

न्यूझीलंडनं 2015 आणि 2019 अशा सलग दोन वन डे विश्वचषकात फायनल गाठली होती, पण विजेतेपदानं त्यांना हुलकावणी दिली.

आता केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडची टीम यंदाच्या विश्वचषकात आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळेल.

BBC

2019 सालच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. आता टेंबा बवुमाच्या नेतृत्वाखाली त्यांची टीम विश्वचषकात खेळते आहे.

BBC

भारतीय उपखंडात खेळण्याचा अनुभव श्रीलंकेसाठी यंदाच्या वन डे विश्वचषकात फायद्याचा ठरू शकतो. दासुन शनाकाच्या नेतृत्त्वाखाली त्यांची टीम या स्पर्धेत खेळेल.

राखीव खेळाडू म्हणून त्यांचा चमिका करुणारत्ने या दौऱ्यावर येणार आहे.

BBC

श्रीलंकेप्रमाणेच बांगलादेशची टीमही भारतात खेळताना काय कामगिरी बजावते याकडे लक्ष राहील. शाकीब अल हसन यंदाच्या विश्वचषकात त्यांचं नेतृत्त्व करणार आहे.

BBC

अफगाणिस्तानच्या टीमनं 2015 साली वन डे विश्वचषकात पदार्पण केलं होतं. 2019 सालीही ते सहभागी झाले आणि यंदाही त्यांची टीम उत्सुकतेचा विषय ठरू शकते.

विश्वचषकाआधी सराव सामन्यांमध्ये अफगाणिस्ताननं श्रीलंकेवर सनसनाटी विजय मिळवला आहे. हशमतुल्ला शाहिदी त्याचंं नेतृत्त्व करतो आहे.

BBC

नेदरलँड्सची टीम स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्त्वाखाली विश्वचषकात खेळणार आहे.

BBC

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)