सनी देओलला शेतकरी दादा म्हणाले, 'तुम्ही तर सनी देओलसारखेच दिसता'

सनी देओल

दिवसभरातली शेतीभातीची कामं आटोपून शेतकरी बैलगाडी चालवत घरी परतत असतो. त्याचवेळी गावात फेरफटका मारत असलेला माणूस शेतकऱ्याला थांबवतो. त्याच्याशी गप्पा मारू लागतो.

गप्पा मारतानाच शेतकऱ्याच्या काहीतरी लक्षात येतं आणि तो एकदम विचारतो- तुम्ही सनी देओलसारखे दिसताय! पलीकडचा माणूस खळखळून हसतो आणि म्हणतो हो, मी सनी देओलच आहे. शेतकरी एकदम आनंदतो.

आम्ही तुमचे आणि तुमच्या वडिलांचे व्हीडिओ मोबाईलवर पाहत असतो असं शेतकरी सांगतो. सनी देओल त्या शेतकऱ्याची विचारपूस करतात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला असं तो शेतकरी सनी देओलला सांगतो.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Instagram पोस्ट समाप्त

सनी देओल गदर चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्ताने राज्यात आहेत. अहमदनगर भागात हे चित्रीकरण सुरू आहे.

सनी देओल, अमिषा पटेल आणि अमरिश पुरी अभिनित गदर एक प्रेमकहाणी चित्रपट प्रचंड हिट झाला होता.

चित्रपटातली गाणीही लोकप्रिय झाली होती. 18 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गदर एक प्रेम कथा चित्रपटाने तब्बल 256 कोटींची कमाई केली होती.

सनी देओल, गदर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सनी देओल

सनी देओल यांनी स्वत:च हा व्हीडिओ शेअर केला आहे. देओल यांनी शेतकऱ्याबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटोही व्हायरल झाला आहे.

1982 साली प्रदर्शित झालेल्या 'बेताब' या चित्रपटातून सनी देओल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 1990 मध्ये आलेल्या 'घायल' या चित्रपटानं त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

1993 साली आलेल्या 'दामिनी' चित्रपटातील सनी देओल यांची वकिलाची भूमिकाही गाजली होती. बॉर्डर, गदर , हिरो यासारख्या चित्रपटांमधून सनी देओल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

बॉर्डर, गदर, अर्जून, सल्तन, डकैत, त्रिदेव, चालबाज, विष्णू देवा, यमला पगला दिवाना या चित्रपटातील भूमिकांसाठी सनी देओल चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.

11 ऑगस्ट 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.

अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सनी देओल गुरदासपूर मतदारसंघाचे खासदार आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)