'हर हर महादेव'ला विरोध का केला जात आहे?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित ‘हर हर महादेव' या चित्रपटावर आता विविध संघटनांकडून आक्षेप घेतला जातोय. महत्त्वाचं म्हणजे ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय.








