'द पॅसिफायर ट्रेंड' नेमका काय आहे आणि यानं खरंच नैराश्य कमी होतं?

व्हीडिओ कॅप्शन, द पॅसिफायर ट्रेंड नेमका काय आहे? तुम्हाला हा ट्रेंड फॉलो करायला आवडेल?
'द पॅसिफायर ट्रेंड' नेमका काय आहे आणि यानं खरंच नैराश्य कमी होतं?

हे पॅसिफायर्स खरंतच रडणाऱ्या बाळांना शांत करण्यासाठी वापरली जातात. पण आता चीनमध्ये याचा वापर तरुण मुलं मुली करू लागले आहेत.

The Cover च्या एका रिपोर्टनुसार, एकाच महिन्यात प्रौढांसाठीचे सुमारे 2 हजार पॅसिफायर्स ऑनलाइन विकले गेलेत. चीनमध्ये यांची किंमत 10 ते 500 युआन दरम्यान आहे, म्हणजे भारतीय रुपयांमध्ये साधारण 120 रुपयांपासून ते 6 हजार रुपयांपर्यंत.

पण लोक हे का विकत घेतायत?