मुंबईत रात्रंदिवस पावसाने सर्वत्र 'तुंबई', रेड अलर्टबद्दल हवामान विभागाने काय सांगितलं?

व्हीडिओ कॅप्शन, मुंबईत रात्रंदिवस पावसाने सर्वत्र 'तुंबई', रेड अलर्टबद्दल हवामान विभागाने सांगितलं...
मुंबईत रात्रंदिवस पावसाने सर्वत्र 'तुंबई', रेड अलर्टबद्दल हवामान विभागाने काय सांगितलं?

राज्यात पावसाचा जोर वाढला असून गेल्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे.

भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने दिलेल्या माहितीनुसार 16 ऑगस्ट ते 21 ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रात अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून ही माहिती देण्यात आली.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (18 ऑगस्ट) महाराष्ट्राच्या किनारी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेशचा किनारी भाग, गोव्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.