जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी; अनेकांचा मृत्यू

व्हीडिओ कॅप्शन, जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी; अनेकांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी; अनेकांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील एका दुर्गम गावात 14 ऑगस्टला झालेल्या मोठ्या ढगफुटीमुळे अनेकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

चासोती इथे दुपारी 12 ते 1 दरम्यान ही घटना घडली. माचैल माता यात्रेसाठी इथे मोठी गर्दी जमली होती. याच ठिकाणाहून मंदिरापर्यंतचा 8.5 किमीचा प्रवास सुरू होतो.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे.