टेस्ला गाडी चालवून कसं वाटतं? ऑटोपायलट खरंच काम करतं का?

व्हीडिओ कॅप्शन, टेस्ला गाडी चालवून कसं वाटतं? ऑटोपायलट खरंच काम करतं का?
टेस्ला गाडी चालवून कसं वाटतं? ऑटोपायलट खरंच काम करतं का?

टेस्लाचं मॉडेल Y भारतात लाँच झालं आहे, आणि या गाडीची किंमत 60 लाखांपासून सुरू होते.

ही गाडी दोन रेंजच्या पर्यायांमध्ये येते - एका चार्जवर 500 किमी आणि दुसरी लाँगरेंज एका चार्जमध्ये 622 किमी चालते.

पण यावर आणखी 6 लाख रुपये भरून तुम्ही ऑटोपायलट फीचर सुरू करून घेऊ शकता. हे फीचर, ज्यात चालक स्टीअरिंगवरचा हात सोडूनही गाडी चालवू शकतो, जगभरात चर्चेचं आणि काहीसं वादाचं कारणही ठरलं आहे.

या फीचरमुळे टेस्लाला अमेरिकेत आणि युरोपात अनेक चौकशांना सामोरं जावं लागलं, आणि मोठा दंडही भरावा लागला.

पण भारतात हे फीचर काम करेल की नाही? टेस्ला भविष्यात त्यांच्या गाड्या भारतात बनवेल, की कायम चीनवरून आयातच होत राहील?

  • व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
  • शूट - प्रभात कुमार