गर्भाशयाऐवजी महिलेच्या यकृतात वाढत होतं तीन महिन्यांचं भ्रूण

व्हीडिओ कॅप्शन, महिलेच्या यकृतात वाढत होतं तीन महिन्यांचं भ्रूण
गर्भाशयाऐवजी महिलेच्या यकृतात वाढत होतं तीन महिन्यांचं भ्रूण

उत्तर प्रदेशच्या एका महिलेच्या गरोदरपणानं सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून टाकलंय. या महिलेच्या गर्भाशयात नाही, तर लिव्हरमध्ये गर्भ वाढत असल्याचं समोर आलं.

बुलंदशहर जिल्ह्याच्या दस्तूरा गावात राहणाऱ्या 35 वर्षांच्या सर्वेश गेल्या काही दिवसांपासून अनेक वरिष्ठ डॉक्टरांच्या आणि संशोधकांच्या अभ्यासाचा विषय झाल्यात.

हे नेमकं झालं कसं या प्रश्नाचं उत्तर सामान्य माणसांसोबतच तज्ज्ञांनाही पडत आहे. शिवाय, सर्वेश यांच्या आरोग्याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.