कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयानंतर वादंग पण, आरोग्याला नेमका काय धोका आहे?
कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयानंतर वादंग पण, आरोग्याला नेमका काय धोका आहे?
मुंबई आणि ठाण्यात कबुतरांना खायला घालण्यावर बंदी आल्याने एकीकडे चर्चेला आणि वादाला उधाण आलं आहे.
मिरा रोड परिसरात कबुतरांना खायला घालण्यावरून दोन रहिवाशांमध्ये झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत गेला.
या निमित्ताने प्रश्न उभा राहतो तो म्हणजे, कबुतरांमुळे माणसाच्या आरोग्याला नेमका कोणता धोका आहे? कबुतरांमुळे खरंच गंभीर आजार होऊ शकतात? याच विषयावर बीबीसी प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी लीलावती रुग्णालयाचे छातीरोग तज्ज्ञ डॉ. सलील बेंद्रे यांच्याशी संवाद साधला






