नदीच्या काठावर असूनही ही गावं वर्षानुवर्षं तहानलेली का आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, पूर्णा नदीकाठची ही गावं वर्षानुवर्षं तहानलेली का आहेत?
नदीच्या काठावर असूनही ही गावं वर्षानुवर्षं तहानलेली का आहेत?

पूर्णा नदीकाठची शेगांव तालुक्यातली ही 38 गावं पूरप्रवण क्षेत्रात येतात. प्रत्येक घरात पिण्याचं शुद्ध पाणी मिळायला हवं, पण ही गावं बाराही महिने तहानलेली असतात.

बुलढाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की- अकोला एमजेपी आणि बुलढाणा एमजेपी, जलजीवन मिशन अशा सर्वांच्या संयुक्तातून एक योजना सुरू आहे.

योजनेचं काम 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. पण अजूनही गावकरी साशंक आहेत. रिपोर्ट- भाग्यश्री राऊत शूट- मनोज आगलावे व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर