स्नेहा बारवे : महिला पत्रकाराला मारहाण प्रकरणाला महिना उलटून मुख्य आरोपीला अटक का नाही?
स्नेहा बारवे : महिला पत्रकाराला मारहाण प्रकरणाला महिना उलटून मुख्य आरोपीला अटक का नाही?
पुणे जिल्ह्यातील मंचरमधील पत्रकार स्नेहा बारवे यांना एका अतिक्रमणासंदर्भातील रिपोर्टिंग करताना मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. ही घटना 4 जुलैला घडली होती.
या मारहाणीनंतर बरेच दिवस पत्रकार स्नेहा बारवे यांना हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. असा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणानंतर महिनाभरात काय काय घडलं? पोलिसांनी काय कारवाई केली? याबद्दल जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी स्नेहा बारवे यांच्याशी संवाद साधला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






