मतदार कार्ड ते 'मतचोरी'पर्यंत तरुण मतदार काय म्हणतात?
मतदार कार्ड ते 'मतचोरी'पर्यंत तरुण मतदार काय म्हणतात?
राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर 'मतचोरी'चे आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांना या गोष्टी शपथेवर लिहून द्यायला सांगितल्या आहेत. बीबीसी मराठीने तरुण मतदारांना या सगळ्याबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
शिवाय निवडणूक प्रक्रिया, मतदार ओळखपत्र या गोष्टींबाबत त्यांना किती माहिती आहे हेदेखील विचारलं. छत्रपती संभाजीनगरहून श्रीकांत बंगाळे आणि धाराशीवहून मुस्तान मिर्झा यांचा हा रिपोर्ट.






