सोमनाथ सूर्यवंशींच्या आई म्हणतात; 'हे सरकार पैशावाल्याचं मायबाप हाय, गरिबाचं नाही'

व्हीडिओ कॅप्शन, ‘8 महिने झाले, न्याय भेटेल म्हणून मी वाट बघतेय. हे सरकार पैशावाल्याचं मायबाप हाय, गरिबाचं नाही’
सोमनाथ सूर्यवंशींच्या आई म्हणतात; 'हे सरकार पैशावाल्याचं मायबाप हाय, गरिबाचं नाही'

डिसेंबर 2024 मध्ये परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची नासधूस करण्यात आल्यानंतर शहरात हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटनांनंतर पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला.

सर्वोच्च न्यायालयानं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात दाखल याचिकेवर नुकताच निर्णय दिला. त्यानुसार, 2 ऑगस्ट रोजी परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत अनोळखी व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

गेल्या 8 महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचं सोमनाथ यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांचं म्हणणं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)